आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळकवठेत दोन गटांत हाणामारी, सहाजण जखमी : गावात पोलिस बंदोबस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍मक छायाचित्र
सोलापूर- गणपतीविसर्जनावेळी वादावादीतून झालेली हाणामारी आणि स्वस्त धान्य दुकानाच्या वादातून माळकवठे येथे मंगळवारी (दि. २२) दोन गटात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हाणामारी झाली. चाकूने वार केल्याने सहाजण जखमी झाले. मंद्रूप पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. गावात पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. सोमनाथ कल्लप्पा कोटे, खंडप्पा विश्वनाथ वाघमोडे, अशोक नागनाथ देसाई, बाळासाहेब कल्लप्पा थोरात आणि दुंडप्पा शिवप्पा बगले, नागनाथ राचप्पा मरब अशी दोन्ही गटांच्या जखमींची नावे आहेत.
सोमवारी (दि. २१) पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यावेळी मिरवणुकीत थोरात गायकवाड या तरुणामध्ये भांडण झाले होते. माजी सरपंच अमसिद्ध थोरात सगरे गटाने याचा गायकवाड यास जाब विचारला. तसेच सिद्धाराम बगले या भांडणाचा सूत्रधार आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानही त्याच्याकडे आहे. जनतेशी उद्धटपणे वागतो, असे म्हणत थोरात सगरे गटाने बगले यांनाही जाब विचारला. त्यातूनच दोन्ही गटात वादावादी होऊन हाणामारी झाली.

बगलेसमर्थकाचा वार
बगलेगटाचे नागनाथ मरब इतरांनी चाकूने वार केल्याने चारजण जखमी झाले. थोरात, सगरे बगले गटांचा हा धुमाकूळ दुपारपासून सुरूच होता. बसस्थानकावर बगले कुटुंबातील एका वृद्धास थोरात गटाने अंगावरील कपडे काढून मारले. या एकूण वातावरणामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. बगले गटाच्या दोघांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

बंदोबस्तवाढवला
उपविभागीयपोलिस अधिकारी अभय डोंगरे, मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी माळकवठे गावाला भेट दिली. बंदोबस्तासाठी पोिलस फौजफाटा गावात तैनात केला आहे.