आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आल्याचे सांगताच तो पळाला नि रेल्वेखाली आला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मित्रांसोबत पत्त्यांचा जुगार खेळत बसलेला तरुणास काहींनी पोलिस आल्याचे सांगितले. घाबरून त्याने पुढचा मागचा विचार करता सुसाट पळायला सुरुवात केली. या धावपळीत रेल्वेगाडी येत असल्याचेही त्याच्या लक्षात आले नाहीत. तो तरुण रेल्वेखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. मजहर अश्पाक कलादगी (वय २१, रा. मौलाली चौक) असे त्याचे नाव आहे. कंबरतलाव परिसरात गुरुवारी ही घटना घडली.

मजहर आणि त्याचे काही मित्र मिळून यांनी जेवणाची पार्टी केली. त्यानंतर कंबरतलाव परिसरात बसून ते पत्ते खेळत होते. त्यावेळी काही मित्रांनी पोलिस आले असल्याचे सांगितले. त्यामुळे मजहरची घाबरगुंडी उडाली. आजूबाजूचा अंदाज घेता तो तसाच उठला आणि रुळ ओलांडण्यासाठी त्याच्या दिशेने पळाला. मात्र, त्याच वेळी रेल्वेगाडी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. तो रेल्वेगाडी खाली आल्याने गंभीर जखमी झाला.

मित्रांनी त्याला त्या अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत सिव्हील पेालिस चौकीत नोंद आहे. रुग्णालयात सायंकाळी नातेवाईक आणि इतरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.