आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवताडे गटाला सत्तांतराने धक्का, काँग्रेस- राष्ट्रवादी गटाच्या आघाडीने सत्ता खेचून आणली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा - मंगळवेढा नगरपालिकेत आवताडे गटाच्या सत्तेला सुरूंग लावत आमदार भारत भालके, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व राहुल शहा यांच्या काँग्रेस- राष्ट्रवादी गटाच्या आघाडीने सत्ता खेचून आणली. आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अरुणा माळी या १२५३ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ७६१६ तर पराभूत भाजपच्या शीतल बुरकुल यांना ६३६३ मते पडली. काँग्रेसचे सात, राष्ट्रवादीचे चार असे ११ उमेदवार निवडून आले.
महायुतीतील भाजपचे तीन, शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर आमदार प्रशांत परिचारक आघाडी पुरस्कृत एक जागेवर यश मिळाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी यांचा शिवसेनेचे रामचंद्र कोंडुभैरी यांनी दारुण पराभव केला आहे. तर राष्ट्रवादी माजी उपनगराध्यक्ष वसंत मुदगूल यांचा अवघ्या १४ मतांनी भाजपचे नवखे उमेदवार अनिल बोदाडे यांनी पराभूत केले. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये प्रभाग क्र. एक ते चारची मतमोजणी पहिल्या टप्प्यात घेण्यात आली. तर प्रभाग क्र. पाच ते अाठची मतमोजणी दुसऱ्या टप्प्यात झाली. या नंतर शेवटी नगराध्यक्ष पदाची मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार (कंसात पक्ष, पडलेली मते)
प्रभाग क्र. १अ - अनिता नागणे (राष्ट्रवादी)-६३० , नीलावती आटकळे (आ.परिचारक व रासप आघाडी)- ४१७, प्रभाग १ ब संकेत खटके (काँग्रेस) -६३४ , पांडुरंग नकाते (शिवसेना भाजप पुरस्कृत आघाडी)-४२४. प्रभाग क्र २अ मध्ये -अजित जगताप (राष्ट्रवादी) -१५१८, ज्ञानोबा फुगारे (भाजप)- ५८६, प्रभाग क्र. २ ब राजश्री टाकणे (काँग्रेस) -१११७, अमृता गवळी (शिवसेना भाजप पुरस्कृत आघाडी) -६५२, प्रभाग क्र. ३अ - भागीरथी नागणे (काँग्रेस) -९१२, उज्ज्वला सावंत (शिवसेना)-६९७, प्रभाग क्र. ३ ब- प्रवीण खवतोडे (राष्ट्रवादी)- ८९६, कलावती खंदारे (शिवसेना)-७०३, प्रभाग क्र. ४ अ चंद्रकांत घुले (काँग्रेस) -९९०, अशिष यादव (भाजप)-६५७, प्रभाग क्र. ४ ब सुमन शिंदे (काँग्रेस) -८८२, बबिता शिंदे (भाजपा) -७०७, प्रभाग क्र. ५ अ - पांडुरंग नाईकवाडी (काँग्रेस) -९८८, मोहन जोशी (आ.परिचारक, रासप आघाडी)-४३७, प्रभाग क्र. ५ ब -सब्जपरी फकीर (राष्ट्रवादी)-८५७, लक्ष्मी भिमदे (शिवसेना भाजप पुरस्कृत आघाडी)-४९३, प्रभाग क्र. ६ अ- अनिल बोदाडे (भाजप) -९७४, वसंत मुदगूल (राष्ट्रवादी)-९६१, प्रभाग क्र. ६ ब लक्ष्मी म्हेत्रे (भाजप)-१०८४, सुरेखा पवार (राष्ट्रवादी)-८१९, प्रभाग क्र. ७ अ -रामचंद्र कोंडुभैरी (शिवसेना) -८७७, चंदशेखर कोंडुभैरी (राष्ट्रवादी)- ६६५, प्रभाग क्र. ७ ब पारुबाई जाधव (काँग्रेस) -१३४१, तेजश्री मेहरकर (आ.परिचारक पुरस्कृत आघाडी)-६४९, प्रभाग क्र. ८ अ -प्रशांत यादव (आ.परिचारक व रासप आघाडी)-१०३४, मुझप्फर काझी (शिवसेना भाजप पुरस्कृत आघाडी)-९१३, प्रभाग क्र. ८ ब रतन पडवळे (शिवसेना)-१५२३, राजश्री भगरे (काँग्रेस)- १०७७, प्रभाग क्र. ८ क निर्मला माने (भाजप)-१४०३, रेश्मा बेंद्रे (राष्ट्रवादी)-१३४६.
बातम्या आणखी आहेत...