आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मांजरा'त यंदाही ठणठणाट, पाणीटंचाईचे गडद सावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण - मराठवाड्यात उस्मानाबाद-बीड जिल्ह्याच्या सीमेवर १९८१ मध्ये बांधण्यात आलेले धणेगाव येथील मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा चार वर्षांपासून शून्य टक्क्यापर्यंत राहिलेला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. धरणावर विसंबून असलेच्या शहरांसह गावांना टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. उपयुक्त साठा नसल्याने काही गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, पावसाने अशीच ओढ दिल्यास उर्वरित गावांवर देखील टंचाई ओढावणार आहे.

२०१०-११ मध्ये मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. त्यावेळी धरण ९७ टक्के भरले होते. परंतु त्यानंतर या परिसरात पुरेसा पाऊस झाल्याने गेल्या चार वर्षांपासून धरणात पाणीसाठा झाला नाही. धरणाची उपयुक्त पाणीपातळी शून्य टक्क्यावर घसरली आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता २२४.०९३ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७६.९६३ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या एकूण पाणीसाठा क्षमतेपैकी ४७.१३० दशलक्ष घनमीटर साठा हा मृतसाठा म्हणून निर्धारित केला आहे. सध्या धरणात मृतसाठ्याच्याही खाली म्हणजेच २.९२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणातून दुष्काळी उपाययोजना म्हणून सध्या फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मांजरा धरणातून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरासह तालुक्यातील १५ ते २० गावांना तर मराठवाड्यातील लातूर शहर, लातूर एमआयडीसी, आंबेजोगाई शहर, केज, धारूर या शहरांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. धरण परिसरात जास्त पाऊस होऊन धरण भरले तर लाभक्षेत्रात ९० किमीचा डावा कालवा आणि ७८ किमीचा उजवा कालवा आहे. या माध्यमातून १८२२३ हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु धरणात उपयुक्त जलसाठा झाला नसल्याने शेतीसाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. उपलब्ध जलसाठा काही दिवसच पिण्यासाठी पुरेल एवढाच आहे. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या शहरांसह गावांना अगामी काळात भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे.

"जलयुक्त'चाही तूर्तास नाही फायदा
यावर्षीमोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना तसेच पाणलोट विकास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागली आाहेत. अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने परिसरातील बहुतांश ओढे, नाले, तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मृतसाठ्यामुळे पाणीपुरवठा बंद
मांजरा धरणातून विविध योजनेंतर्गत सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. धरणाची पाणीपातळी मृतसाठ्याच्याही खाली येऊन २.९२० दलघमी एवढा मृतसाठा आहे. त्यामुळे काही शहरांसह गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.'' एस.डी. पाटील, शाखाधिकारी, मांजरा

पाणी वापराबाबत नियोजनाची गरज
परिसरातीलएकूण परिस्थिती पाहता भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशसकीय पातळीवरून शेतीच्या तसेच पिण्याच्या पाणी वापराबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे. शासकीय पातळीवरून याबाबत जागृती करून पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे.

काही गावांचा पाणीपुरवठा बंद
धरणातउपयुक्त पाणीसाठा नसल्याने आंबेजोगाई, केज, धारूर या शहरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास उर्वरित शहरांसह खेड्यांचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती निर्माण झालीआहे.

पाणीपातळीघटण्यास सुरुवात
पावसानेदडी मारल्याने परिसरातील जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली नाही. तसेच, अनेकांच्या विहिरी कोरड्या पडल्याचे विदारक चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी घटत असल्याने टंचाईची दाहकताही वाढत आहे.

काही गावांचा पाणीपुरवठा बंद
धरणातउपयुक्त पाणीसाठा नसल्याने आंबेजोगाई, केज, धारूर या शहरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास उर्वरित शहरांसह खेड्यांचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती निर्माण झालीआहे.

पाणीपातळीघटण्यास सुरुवात
पावसानेदडी मारल्याने परिसरातील जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली नाही. तसेच, अनेकांच्या विहिरी कोरड्या पडल्याचे विदारक चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी घटत असल्याने टंचाईची दाहकताही वाढत आहे.

२२४.०९३ - दलघमी धरणाची साठवण क्षमता
१७६.९६३ - दलघमी उपयुक्त साठा क्षमता
४७.१३० - दलघमी निर्धारित मृतसाठा
२.९२० - दलघमी सध्याचा मृतसाठा
२० - गावांना तालुक्यातील होतो पाणीपुरवठा
बातम्या आणखी आहेत...