आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेडपीत खातेप्रमुखांची अनेक पदे आहेत रिक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मिनी मंत्रालय अशी आेळख असलेल्या जिल्हा परिषेदत प्रमुख खातेप्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त पदभार असून प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विकास बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका खातेप्रमुखांकडे इतर विभागांचाही पदभार आहे.

यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला. खरीप हंगाम सुरू झाला. पण, जिल्हा परिषदेला अद्याप स्वतंत्र कृषी विकास अधिकारी मिळाला नाही. आठ महिन्यांपूर्वी कृषी विकास अधिकारी मदन मुकणे यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. त्यांच्यावरील कारवाई संदर्भातील फाईल मंत्रालयातील लालफितीच्या कारभारात अडकली आहे. कृषी अधिकारी जी. एन. ताठे यांच्याकडे सध्या अतिरिक्त पदभार आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्याकडे पदाधिकारी झेडपीच्या अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. तत्कालीन प्रकल्प संचालक एच. पी. मुकूळ सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळसाठी स्वतंत्र अधिकारी मिळाले नाही. सध्या महिला बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. इंदिरा आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय यासह बचत गट सक्षमीकरण यासारख्या विविध महत्त्वाच्या योजना त्या विभागातर्फे राबविण्यात येतात. स्वतंत्र अधिकारी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करण्याची गरज आहे. महिला बालकल्याण विभागाच्या तालुकास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची १३ पदे रिक्त आहेत.

पाठपुरावा आहे सुरू
जिल्हा परिषदेतील रिक्त अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. पाणी पुरवठासाठी स्वतंत्र अधिकारी असावा, असे जीवन प्राधिकरणास कळवले आहे. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची रिक्त पदे जास्त आहेत. तो विभाग आता महिला बालकल्याण विभागाकडे असल्याने त्यांच्याकडे आणखी पाठपुरावा करण्यात येईल. पोपट बनसोडे, अतिरिक्त सीइओ
बातम्या आणखी आहेत...