आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांमुळे मराठा आणि मुस्लिम समाजाचे आरक्षण गेले, नारायण राणेंचा आरोप (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यशवंतरावांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंतचे मुख्यमंत्री आपण पाहिले. त्यांनी संस्कृती, संस्कार सांभाळले. पण देवेंद्र फडणवीस यांनी ती सगळी सोडली. या मुख्यमंत्र्यांमुळे मराठा आणि मुस्लिम समाजाचे आरक्षण गेले, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला.  

आसार मैदानातील प्रचारसभेत त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. नोटाबंदीनंतर काळा पैसा बाजूलाच राहिला. आपलाच कष्टाचा पैसा घेण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभे राहण्याची वेळ आली. छोट्या व्यापाऱ्यांपासून बड्या उद्योगांचे बारा वाजले. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे आता एकमेकांची लायकी काढू लागले  आहेत. यांना मते मागण्याचा काय अधिकार, असा सवालही त्यांनी केला.    

डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीनंतर काय स्थिती होईल, याचे भाकीत केले. ते खरे ठरले. तीन लक्ष कोटींचे नुकसान झाले. ही बाब मान्य न करता मोदी यांनी त्यांची चेष्टा केली. रेनकोट घालून आंघोळ करतात, असे हीन बोलले. दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकावून पाहता,? असा सवाल राणेंनी केला. काही कामधंदा नाही? तुमच्या नोटाबंदीने १५ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमले. त्यातील काळा पैसा किती हे सांगत का नाही, असेही ते म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...