आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कोटी रुपयांचा निधी जमवून उभारणार मराठा भवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सकलमराठा समाज पहिल्यांदाच एकत्र आला आहे. याचा सकारात्मक विचार करत ही शक्ती समाजाच्या कामासाठी लावू. समाजाकडून पाच कोटी रुपये निधी जमा करत सोलापुरातील मोक्याच्या ठिकाणी मराठा भवन उभा करू, असा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. रविवारी सायंकाळी गावडे मंगल कार्यालयात मूक माेर्चा खर्चाचे जाहिरीकरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते छत्रपतींचे पूजन केलेे. यावेळी तसेच पुरुषोत्तम बरडे, चंद्रकांत वानकर, मनोहर सपाटे, प्रवीण डोंगरे, बाळराजे पाटील, गणेश वानकर, राजन जाधव, जयकुमार माने, संतोष पवार तसेच तालुक्यातून अालेले प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. देशमुख, जमाखर्चाचे वाचन किसन दाडगे यांनी केले.

येत्या आठवडाभरात पार्क चौकात समाजाचे कार्यालय सुरू करू. समाजाची दिशा धोरणे ठरवण्यासाठी एक मुख्य संयोजन समिती तयार करू. त्यात ५१ विश्वस्त ११ मुख्य सदस्य असतील असे ठरवण्यात आले. तसेच निवडणुकांचे ४५ दिवसांची आचारसंहिता सोडली तर बाकीचे दिवस राजकारण खेळू नये, असा विचार उपस्थित कार्यकर्त्यांतून मांडण्यात आला.

मोर्चाचा जमाखर्च
एकूण जमा रक्कम : ३४ लाख ४९ हजार ६९०
मोर्चाचा एकूण खर्च : १३ लाख ९९ हजार ४३७
खर्च वगळता शिल्लक : २० लाख ५० हजार २५३

असा उभारेल निधी
झालेल्या मोर्चाचे एक विशेषांक तयार करणे.
पुस्तकासोबत मोर्चाची सीडी देत काेटी रुपये उभे करणे.
सकल बांधवांकडून रद्दी घेत महिन्याला २५ लाख जमवणे

१०० मुलींचे वसतिगृह
सोलापूर मोर्चाचे संयोजक माऊली पवार यांनी आगामी योजनांची माहिती दिली. शहरात मोक्याच्या ठिकाणी १० हजार चौरस फूट जागा घेऊ. त्यात एक सभागृह, स्पर्धा परीक्षा अन्य परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या समाजातील मुलामुलींसाठी ग्रंथालय, अभ्यासिका, १०० मुलींचे वसतिगृह असेल अशी संकल्पना मांडली. यावर सर्वांनी होकार दर्शविला.
बातम्या आणखी आहेत...