आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आत्महत्या रोखण्याची जबाबदारी सर्वांची - माजी दुग्धविकासमंत्री चव्हाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रत्येक माणसाने समाजासाठी काहीतरी करावे, कारण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हा विचार कायम असावा, असे विचार माजी दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मांडले. मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने आयोजित दसरा महोत्सव शिवतीर्थ पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. मंगळवारी मुरारजी पेठेतील छत्रपती शिवाजी प्रशालेत याचे सकाळी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माणिकप्रभू मुळे, अॅड. सुरेश गायकवाड, वसंत येळे, शिवराम पापळ, बाळासाहेब कुलकर्णी, विनायक जाधव, दत्ता भोसले, प्रा. महेश माने, सुशीला शिंदे, विजया पाटील, सुरेश पवार, रेखा सपाटे, सुभाष साळुंखे, विनायक पाटील, निवृत्ती केत, अॅड. दादासाहेब देशमुख, मोहन गोरे, शहाजी सुर्वे गुरुजी, आप्पा बचुटे, नामदेव थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. शेफाली विभूते सारिका पंडित यांनी सूत्रसंचालन केले. हणमंतू बेसुळके यांनी आभार मानले. कार्यक्रमापश्चात सर्व उपस्थितांना विजयादशमी निमित्त आपट्याची पाने देत आनंदोत्सव, दसरा साजरा करण्यात आला.
^गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या कर्तृत्ववान व्यक्तींना या व्यासपीठावर आणून त्यांचा गौरव केला आहे. प्रत्येकाने आपल्या समाजासाठी काम करावे. आपल्या हातून चांगले करण्याचा प्रयत्न करावा. समाजात काही माणसे आपल्या कामाचे उघड्या डोळ्याने दखल घेत असतात. मराठा समाज अलीकडे एकसंध राहिल्यामुळे आपल्या समाजबांधवांची कामे जलद गतीने होण्यास मदत होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याचे सत्र सुरू असल्यासारखे दिसते. शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आत्महत्या रोखण्याची आहे. त्यासाठी शासन स्तरावरती आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.
मधुकररावचव्हाण, माजी दुग्धविकास मंत्री
यांचा झाला गौरव
बांधकामव्यावसायिक (कै.) अनिल पंधे यांना त्यांचे चिरंजीव अंकुर पंधे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुरवसे, उत्सव प्रेमी महादेव गवळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभम जगताप, महालक्ष्मी पापड उद्योगाचे उद्योजक राजेश डोंगरे आणि लिम्का बुक रेकॉर्डची कामगिरी करणाऱ्या विनया केत यांना शिवतीर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठा मोर्चा चळवळीचे कार्यकर्ते माऊली पवार यांनी पुरस्कार नम्रपणे नाकारला. मी केवळ मोर्चातील छोटा घटक होतो असे सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती:यावेळीतुकाराम महाराजांचे वंशज कोन्होबा देहुकर महाराज यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, अर्जुन सुरवसे, राजेश डोंगरे श्रीकांत घाडगे, लहू गायकवाड, प्रा. गणेश देशमाने, अरुण वर्मा, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...