आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूक मोर्चाचे नेतृत्व पाच मुलींकडे असणार, तब्बल सहा हजार स्वयंसेवकांची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मराठा समाजाचा मूक मोर्चासाठी जिल्ह्यातून सुमारे अाठ लाख लोक सहभागी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. तसेच पन्नास हजारांहून अधिक दुचाकी, चारचाकी वाहने शहरात येतील. त्यासाठी सात ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. शहरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. महत्त्वाचे काम असल्यास बाहेर पडावे असे अावाहन केले अाहे. मोर्चाच्या मार्गावर सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत रस्ता बंद करण्यात येणार अाहे.
रस्ता मोकळा राहील
मार्केट यार्ड ते सावळेश्वर टोळ नाका या दोन्ही मार्गावरील वाहतूक एका लेनमधून ये-जा करतील. माेर्चासाठी येणाऱ्या वाहनांनासाठी एक लेन मोकळी ठेवण्यात अाली अाहे. वाहनांचा वेग ४० किमीच्या आत ठेवावा. पोलिस, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, क्रेन या वाहनांसाठी एक लेन मोकळी राहील.

सहभागींचा क्रम
मोर्चाच्या अग्रभागी युवती, महिला, वारकरी, शेतकरी, डाॅक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर, उद्योजक, समाजबांधव आणि मराठा समाजातील लोकप्रतिनिधी नेते अशा क्रमाने लोक सहभागी असतील.

असे नियोजन
मागण्यांचे हजार फलक, १० हजार भगवे झेंडे, १० हजार काळ्या टोप्या, होम मैदान पुना नाका येथे ८० फूट उंचीवर मोर्चाची माहिती देणारे दोन मोठे फुगे, मार्गावर पाच अॅम्ब्युलन्स डाॅक्टरांचे पथक, छायाचित्रणासाठी पाच ड्रोन कॅमेरे, संयोजक-स्वयंसेवक यांच्यात संवादासाठी १०० वॉकीटॉकी.

निवेदन वाचून समारोप
मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत. छत्रपती संभाजीराजे चौकातून मोर्चाची सुरुवात सकाळी दहाला जिजाऊ वंदनेने होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मोर्चा होम मैदानाकडे येईल. उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान, राज्यातील आत्महत्या केलेले शेतकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर कोपर्डी येथील घटनेचा निषेध करण्यात येईल. शेवटी मंचावरून पाचही मुलींकडून निवेदनाचे वाचन दुपारी एकच्या सुमारास होईल. त्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप होणार आहे.

मराठासमाजाचा मूकमोर्चा बुधवारी निघणार आहे. त्याची संयोजकांतर्फे तयारी पूर्ण झाली आहे. मोर्चाचे नेतृत्व पाच मुलींकडे असणार आहे. सुमारे सहा हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. लाखो संख्येने लोक यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वयंसेवक म्हणून युवक, हजार युवती-महिला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर्चाच्या साडेतीन किलोमीटर अंतरावर हे स्वयंसेवक काम करणार आहेत. प्रत्येक हजार मीटरवर ५० स्वयंसेवकांची टीम असेल. ही टीमच मोर्चा शिस्तबद्ध निघेल, यासाठी काम करेल. एक हजार स्वयंसेवक होम मैदानावर सेवेत असतील. वाहनतळ ते होम मैदानापर्यंत सर्व नियोजन स्वयंसेवक करतील. युवक स्वयंसेवकांना ‘मावळे’ तर युवती-महिलांना ‘हिरकणी’ असे संबोधन असणार आहे.

जिल्हापरिषद, पंचायत समितीचे ३०० कर्मचारी सहभागी होणार
जिल्हापरिषद पंचायत समितीमधील किमान ३०० पेेक्षा जास्त मराठा समाजाचे कर्मचारी रजा काढून मोर्चात सहभागी होतील, असे मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाखेचे माजी अध्यक्ष राजेंद्र वारगड यांनी सांगितले.
Àसम्राट चौक ते शिवाजी चौक, बाळीवेस ते शिवाजी चौक, कल्पना कॉर्नर ते नवीवेस चौक,लकी चौक ते चार पुतळा सरस्वती चौक, पटवर्धन चौक ते डफरीन चौक, नवल पेट्रोल पंप ते डफरीन चौक, रंगभवन चौक ते डफरीन चौक, रंगभवन चौक ते होम मैदान, मार्केट पोलिस चौक ते होम मैदान, भय्या चौक ते पार्क चौक हे मार्ग बंद राहतील.
पर्यायी मार्ग
जुनाकारंबा नाका ते सम्राट चौक मार्ग पुढे, सम्राट चौक ते बाळीवेस मार्गे पुढे, बाळीवेस ते दत्त चौक ते नवी पेठ मार्गे पुढे, लकी चौक ते नवी पेठ ते दत्त चौक मार्गे पुढे, जुना एम्प्लॉयमेंट चौक ते कुमार चौक मार्गे पुढे, महापौर बंगला ते रेल्वे स्टेशन मार्गे पुढे, महापौर बंगला ते रेल्वे स्टेशन मार्गे पुढे, रंगभवन चौक ते जिल्हाधिकारी निवासस्थान ते विजापूर वेस मार्गे, पंच कट्टा ते विजापूर वेस मार्गे पुढे, भय्या चौक ते रेल्वे स्टेशन मार्गे पुढे अशी वाहने सुरू राहतील.
वाहनतळाची सोय
मंगळवेढ्याहूनयेणारी वाहने : जुनीमिल कंपाउंड. कंपाउंड भरल्यानंतर भय्या चौकापर्यंत वाहने सोडणार नाहीत. त्याएेवजी विष्णू मिल कंपाउंंड, रिलायन्स माॅल, वाॅलमार्ट या ठिकाणी वाहने लावावीत.
अक्कलकोटहून: रंगभवनपरिसर
हैदराबादरोडवरून : मार्केटयार्डाजवळ
विजापूररोड : संभाजीतलाव परिसर
पुणे,पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस मार्गावरून : सावळेश्वरटोलनाका ते जुना पुणे नाका
बार्शीहून: बाळेक्राॅसरोडवरून डाव्या बाजूला वळवून जुना पुणे नाक्याकडे जातील
----------------------
बातम्या आणखी आहेत...