आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा महामोर्चा, जड वाहतूक थांबवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील विविध शहरांमध्ये यशस्वी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत बुधवारी (२१ सप्टेंबर) सकल मराठा समाजाचा मूक महामोर्चा सोलापुरात आयोजित केला अाहे.
जिल्ह्यातील गाव आणि तालुका पातळीवरून मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार अाहेत. सुमारे पन्नास हजार दुचाकी, तीस हजारांहून अधिक चारचाकी वाहने आणि अाठ-दहा लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावेळी शहरातील वाहतूकची कोंडी होऊ नये म्हणून तालुकास्तरावरून येणारी अवजड वाहने सकाळी सात ते रात्री अाठपर्यंत सोलापूरकडे येण्यासाठी बंदी घालण्यात अाली अाहे. अन्य वाहने ये जा करू शकतील. ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियोजनासाठी जय्यत तयारी केली असून याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले अाहे.

सेक्टर पद्धतीने नियोजन
^नागरिकांना सुरक्षित जलद गतीने सोलापुरात येता यावे यासाठी जड वाहने (ट्रक, कंटेनर) यांना बंदी घालण्यात अाली अाहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या मैदानात जड वाहने थांबतील. काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांनाही अाम्ही माहिती दिली अाहे. मुख्य रस्त्यावर सेक्टर पद्धतीने पोलिस नेमून बंदोबस्त राहील. वीरेशप्रभू, पोलिस अधीक्षक

अवजड वाहने कुठे थांबतील
Àपुणेकडून येणारी : अात्मशांतीढाबा, मोहोळ
Àबार्शीहून येणारी : बार्शीशहरातच
Àतुळजापूरर स्त्यावरून येणारी : उळेगावाजवळ
Àहैदराबादकडून येणारी : मुळेगावतांड्याजवळ
Àअक्कलकोटकडून येणारी : अक्कलकोट शहरातच
Àहोटगी गावाकडून : होटगी गावाजवळ
Àमंगळवेढ्याकडून येणारी : मंगळवेढा शहरातच
बातम्या आणखी आहेत...