आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराट चित्रपटातील \'आर्चीची आई\' आता नव्या भूमिकेत; \'तू माझा सांगाती\' या मालिकेत झळकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर(कंदर)- सैराट चित्रपटातील 'आर्चीची आई'ची भूमिका करणाऱ्या भक्ती चव्हाण या आजपासून नवीन भूमिकेत दिसणार आहेत. झी मराठीवर असणाऱ्या'तू माझा सांगाती'या मालिकेत त्या दिसणार आहेत.
 
 
सैराट प्रदर्शित झाल्यानंतरही त्यामधील कलाकारांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटानंतर यातील कलाकार हे वेगवेगळ्या भूमिका, चित्रपटात दिसून आले. 'तू माझा सांगाती' ही तुकाराम महाराज यांच्यावर आधारित आहे.आता यातील अभिनेत्री भक्ती चव्हाण ह्याही आजपासून कलर्स मराठीवर 'तू माझा सांगाती' या मालिकेत नवीन भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सैराटनंतर काम करताना एक वेगळा आनंद आहे. यातील कलाकार चांगल्या प्रकारे काम करत आहेत. सगळे कलाकार एकमेकांना मदत करतात. तर  भरत जाधव हे यात विठ्ठलाची भूमिका करत आहेत.तर एक मराठा लाख मराठा, तुला पण बाशिंग बांधायचय, कॉपी, वंटास चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत, असे दिव्य मराठीशी बोलताना भक्ती चव्हाण यांनी सांगितले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो 
बातम्या आणखी आहेत...