आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्राॅसिटी दुरुस्ती, आरक्षणासाठी महिलाही रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर थांबवा, या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यात सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिस्त अाणि नियोजनाचा अादर्श घालून देणाऱ्या या मोर्चात दोन लाखांहून अधिक महिला सहभागी होत्या. िनयोजनात राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी सहभागी होते, पण पक्ष प्रमुख अन् नेत्यांना बाजूला ठेवून मोर्चातून समाजाचा मूक अाक्रोश शासन दरबारी मांडला.
जिजाऊ वंदनेने सुरुवात
सकाळी ९.३० वाजता छत्रपती संभाजीराजे चौकात जिजाऊ वंदनाने मूकमोर्चास सुरुवात झाली. शिवाजी चौक, नवी वेस पोलिस चौकी, सरस्वती चौक, चार हुतात्मा चौक, पार्क चौक, डफरीन चौक मार्गे हा मोर्चा होम मैदानावर पोहोचला. दुपारी १२.३० वाजता जिजाऊ वंदना झाल्यानंतर श शिवाजी चौकातून मोर्चाने होम मैदानाकडे अागेकूच केली. होम मैदानाची क्षमता दोन लाखांचीच असल्याने उर्वरित जनसमुदाय हा डफरीन चौकात मोर्चाच्या मार्गावरच १.४५ वाजता थांबवला. होम मैदान तुडुंब गर्दीने भरल्याने पुरुष महिलांना होम मैदानात सोडणे बंद करण्यात आले. दरम्यान दुपारी १.१० वाजता जिल्हाधिकारी रणजितकुमार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर दुपारी वाजता निवेदन वाचन, त्यानंतर उरी येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने माेर्चाचा २.१० वाजता समारोप करण्यात आला.

सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर भगवे झेंडे महामूक मोर्चाचे स्टिकर लावलेले दुचाकी चारचाकी वाहने धावत होती. १० वाजल्यांपासून जिल्ह्यातून नागरिकांची गर्दी वाढत गेली. संयोजकांनी लोकप्रतिनिधींना मोर्चाच्या अग्रभागी राहू नका, अशी सूचना केल्याने जिल्ह्यातील खासदार, आमदार लोकप्रतिनिधींनीही जुना पुना नाका चौकात ठिय्या मारला होता. मोर्चामध्ये महिला युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. मोर्चाच्या अग्रभागी लहान बालकांचा आकर्षक पेहराव असलेले शिवरायांचे कुटुंब लक्ष वेधून घेत होते.

२० किलोमीटरपर्यंत रांग
होममैदान ते छत्रपती संभाजीराजे चौक हे अंतर फक्त साडेतीन कि.मी. होते. होम मैदान मोर्चाचा मार्ग गर्दीने भरल्याने उर्वरित मोर्चेकरी रस्त्यावरच थांबले. सोलापूर-पुणे नॅशनल हायवेवरील करमाळा मोहोळ तालुक्यातील काही जणांना शहरातही येता आले नाही. वाहनांची संख्या वाढल्याने काही मोर्चेकरी शहरापासून २० किलोमीटरवर असलेल्या सावळेश्वर येथूनच पायी चालत येणे पसंत केले.
मराठासमाजाचा मोर्चा हा केवळ दलितांच्या विरोधात नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. दुसरीकडे राजकीय व्यासपीठावर नेहमीच एकमेकांच्या विरोधात असणारे सर्व नेते अाणि वेगवगळे घटक यांना मोर्चाने एकत्र अाणले. नव्या चेहऱ्यांनी पुढे येऊन २४ दिवसांत केलेल्या बांधणीतून हा मोर्चा यशस्वी झाला.

असा झाला निर्णय
सोलापूरला मोर्चा काढायचा की नाही याबाबत ३० अाॅगस्टपर्यंत कोणालाच काही कल्पना नव्हती. अौरंगाबादच्या मोर्चानंतर केवळ माऊली पवार अाणि चौघांनी चर्चा केली. पण त्यानंतर उस्मानाबाद येथेही मोर्चा यशस्वी झाला, दहा लाखांच्यावर सहभाग दिसला. त्यामुळे मग सोलापुरात मोर्चा काढायाचा विचार पक्का झाला. त्यासाठी पुढाकार घेतला तो कधीही राजकीय व्यासपीठावर दिसणाऱ्या तरुणांनी. सुशील रसिक सभागृहात पहिली बैठक घेतली. ३० अाॅगस्टच्या बैठकीला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मग मोर्चाचे नियोजन सुरू झाले.
पहिला प्रश्न होता तो हा, मोर्चा दलित विरोधात नाही, केवळ मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात अाहे हे पटवून देण्याचा. त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यातून पंढरपूर इतर काही ठिकाणच्या दलित संघटनांनीही पाठिंब्याची पत्रे दिली. त्यानंतर वीरशैव, पद्मशाली समाजानेही पाठिंबा दिला. नंतर समाजातील राजकीय नेत्यांना विश्वासात घेतले नेत्यांनी पुढाकार घेऊ नये, केवळ पाठिंबा देण्याची भूमिका घ्यावी यासाठी प्रयत्न केले. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज अाहे हे पटवून दिले. त्यानंतर मग मोर्चातील सहभागासाठी प्रयत्न झाले.

पहिली बैठक पत्रकारांची
मराठा समाजातील पत्रकारांची पहिली बैठक झाली. त्यापाठोपाठ वकील, डाॅक्टर, अभियंते, उद्योजक, कर्मचारी अादी वेगवेगळ्या घटकातील समाजबांधवांची बैठक घेण्यात अाली. त्यांच्याकडून मोर्चाच्या व्यवस्थापनासाठी सूचनाही घेण्यात अाल्या. तयारीसाठी एक व्यासपीठ हवे होते, ते गावडे मंगल कार्यालयाच्या रूपाने मिळाले. तेथून गती मिळाली. वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन या मोर्चाला यशस्वी करण्याचा चंगच बांधला होता.

नव्यादमाचे कार्यकर्ते
मोर्चा यशस्वी करण्यासाठी जी अाखणी झाली त्यात सर्वच नव्या दमाचे राजकीय संबंध नसणारे पाच हजार कार्यकर्ते, पाचशे महिला यांची टीम कार्यरत होती. ते प्रत्येक गावात जाऊन मोर्चात सहभागासाठी प्रयत्न करत होते. दुसरीकडे प्रश्नांचीही तीव्रताही होती. त्यामुळे रात्रभर पाऊस होता, सकाळीही रिमझिम चालू होती, तरीही मोर्चात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला.
घरात बुधवारी पहिला म्हाळ होता, सकाळी लवकर तो उरकून मोर्चाच्या तयारीत गुंतल्याचे सांगून अाई वडिलांच्या पुण्याईनेच मला नियोजनात यश मिळाल्याचे माऊली पवार यांनी सांगितले.

सोलापूर. गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६
मोर्चा संपला होता, लोक येतच होते
दुपारीदोन वाजेच्या सुमारास मोर्चाचे कामकाज संपले होते. एकीकडून मोर्चेकरी परतत होते, तर वाहतूक जॅम झाल्याने रस्त्यातच अडकलेले जवळपास तेवढेच मोर्चेकरी शहरात दाखल होत होते. पुणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोक थांबून होते, ते लोक दोन वाजल्यानंतर शहरात येत होते. त्यामुळे शहरातील सर्व गर्दी संपायला जवळपास दुपारचे चार वाजले. सकाळी नऊ ते दुपारी चार असे जवळपास सात तास मोर्चा चालला. प्रत्येक दहा, वीस फुटावर एक स्पिकर लावल्याने होम मैदानावरील सूचना सर्वांना मिळत होत्या.

संदेश चुकीचा जावू नये म्हणून घेतली काळजी
शिवाजीचौकात अभिवादन केल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी संयोजकांना बाइट मागितली तेव्हा त्यांना तेथे देता डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाईट देण्यात अाली. तेथे स्पष्ट करण्यात अाले की, अाम्ही जशा जिजाऊंच्या कन्या अाहोत, तशाच बाबासाहेबांच्याही कन्या अाहोत. अारक्षण, पेन्शन, शेतकऱ्यांना मदत अाणि अॅट्राॅसिटीचा होत असलेला दुरूपयोग या विषयावर अाम्ही लढतो अाहोत, असे स्पष्ट करण्यात अाल्याचे प्रमुख संयोजक माऊली पवार यांनी सांगितले.

१. कोपर्डी प्रकरणातील आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करून तो खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
२. अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
३. सकल मराठा समाजाला प्रथम टप्प्यात शैक्षणिक, नोकरीत पूर्णपणे ओबीसी दर्जाचे आरक्षण मिळावे.
४. इबीसी सवलतीची मर्यादा लाखांपर्यंत वाढवावी.
५. शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे.
६. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.
७. मराठा आरक्षणाचा मुद्दा हायकोर्टात भक्कमपणे मांडण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.
कृषी मालास कृषीपूरक उत्पादनास हमीभाव द्यावा.
८. शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी.
९. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची मदत करावी.
१०. शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी तत्काळ बिनव्याजी कर्जपुरवठा करणेची तरतूद करावी.
११. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय मराठा वसतिगृहे सुरू करावीत.
१२. मुंबई येथील अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक पूर्ण करावे.
१३. महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करावेत.

दुपारी एक वाजता होम मैदानात पुरुष मोर्चेकऱ्यांचा प्रवेश थांबवण्यात आला. फक्त महिलांसाठी प्रवेश देण्यात येत होता. भगव्या झेंड्यांनी मैदान फुलून गेले. अनेकांच्या छातीवर मराठा महामूकमोर्चाचे स्टिकर निषेधाची काळी पट्टी.
बातम्या आणखी आहेत...