आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरः खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचे अपहरण, महिलांच्या ओरडण्याने डाव उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सहा दरोडेखोरांनी खुराना ट्रॅव्‍हल्‍सच्‍या कोल्‍हापूर ते नागपूर (एमएच 40/एटी 0187) या आराम बसचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, यात त्‍यांना यश आले नाही. दरम्‍यान, ग्रामस्‍थांनी एका दरोडेखोरास पकडले. ही थरारक घटना रविवारी मध्‍यरात्री तामलवाडीजवळ घडली. विशाल माणिक गोडसे (28, रा. धोत्री, ता. तुळजापूर) असे पकडलेल्‍या दरोडेखोराचे नाव आहे. दरम्यान, बसमधील महिला ओरडल्याने थोडक्यात संकट टळले. अन्यथा मोठी घटना घडली असती. रात्रीच्या आंधारात दरोडेखोर काहीही करु शकले असते.
नेमके काय झाले...
> रविवारी दुपारी 3 वाजताच्‍या सुमारास ही बस कोल्‍हापुरात नागपूरकडे रवाना झाली.
> रात्री 10 वाजताच्‍या सुमारास सोलापूर ते तुळजापूर मार्गावर असलेल्‍या उळेगाव जवळच्‍या अशोका ढाब्‍यावर ही बस थांबली.
> 30 पैकी काही प्रवासी जेवणासाठी खाली उतरले तर काही गाडीतच झोपले.
> जेवण आटोपल्यानंतर गाडी पुढे निघाली.
> काहीच अंतरावर जाताच बाळे पुलावर सहा व्‍यक्‍ती या बसच्‍या पुढे आडव्‍या झाल्‍या.
> काय झाले ते कळाले नसल्‍याने चालकाने बस थांबवली.
> दरम्‍यान, रस्‍त्‍यात उभ्‍या असलेल्‍या सहा व्‍यक्‍तींपैकी काहींनी बसच्‍या समोरच्या काचेवर दगड मारुन ती फोडली.
> यात कॅबिनमध्‍ये बसलेले तिघे जण जखमी झाले.
> त्‍या नंतर दोघे जण तत्‍काळ बसमध्‍ये घुसले आणि त्‍यांनी चालकाला मारहाण करुन खाली ओढले.
> त्‍या नंतर त्‍याने गाडीचा ताबा घेऊन गाडी उलट दिशेने उळेगावाजवळ आणली.
> ते धोत्री मार्गे गाडीला पुढे नेणार होते. परंतु, कासेगाव जवळचा वळण रस्‍ता अरुंद असल्‍याने चालकाला ती वळवता आला नाही.

कसा फसला अपहरणाचा डाव...

> या वळण रस्‍त्‍यावर गाडी वळताना रस्‍त्‍याने जाणाऱ्या काही व्‍यक्‍तींच्‍या अंगावर ही गाडी गेली.
> त्‍यामुळे रस्‍त्‍यावरील नागरिक संतप्‍त झाले.
> याच वेळी गाडीतील महिलांनी आरडा - ओरडा केला.
> त्‍यामुळे कासेगावमधील काही सर्तक नागरिकांनी काय झाले हे ओळखत बसचा पाठलाग केला आणि तिला अडवले.
> यात त्‍यांनी गाडी चालवणारा दरोडेखोर विशाल माणिक गोडसे याला ताब्‍यात घेतले.
> मात्र, त्‍याचे इतर पाच साथीदार पळून जाण्‍यास यशस्‍वी ठरले.
> सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्‍हा दाखल झाला असून, ग्रामस्‍थांनी पकडलेल्‍या एका दरोडेखोराला पोलिसांनी ताब्‍यात घेतल आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, जखमींची नावे... यापूर्वीसुद्धा झाला होता असाच प्रयत्‍न...
बातम्या आणखी आहेत...