आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिह्यातील गणेश कुलकर्णी हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्‍ह्यातील उपळाई खुर्द (ता. माढा ) येथील उपसरपंच गणेश कुलकर्णी यांच्‍या हत्‍येचा आरोप असलेल्‍या पाचही जणांची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्‍तता केली. 14 ऑक्टोबर 2011 रोजी हे हत्‍याकांड झाले होते.
काय आहे प्रकरण ?
2010 मध्‍ये झालेल्‍या उपळाई ग्रामपंचायत निवडणुकीमध्‍ये गणेश कुलकर्णी यांचा गट विजयी झाला होता. त्‍यामुळे पराभूत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या पाच कार्यकर्त्‍यांनी त्‍यांचा खून केला, अशी तक्रार कुलकर्णी यांच्‍या पत्‍नी ज्योती कुलकर्णी यांनी दिली होती. कुलकर्णी हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांचा खून केला. खुनापूर्वी आरोपींनी गणेश कुलकर्णी यांना खुनाच्या धमक्या दिल्या होत्या, अशी साक्षही ज्योती यांनी न्‍यायालयात नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्‍हा दाखल केला होता. न्‍यायालयाने त्‍यांची निर्दोष मुक्‍तता केली.