आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हॉन कंपनीच्या अक्षम्य दोषावर, सात अधिकाऱ्यांनी नियमांचे केले उल्लंघन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीच्या अनियमिततेवर संबंधित अन्न औषध प्रशासनाचे नियंत्रण प्राधिकारी, सहायक आयुक्त औषध निरीक्षकांनी पांघरुण घातले. वर्षातून किमान एकदा तरी कंपनीची तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बंधनकारक असताना २००९ नंतर तपासणीच करण्यात आली नाही.

औषधे सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार परवान्याच्या अटी वैधानिक तरतुदीनुसार कंपनीचे कामकाज चालते का ? याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास देण्याची जबाबदारी असताना तपासणी अहवालच सादर केला नाही. एकंदरीत २००९ ते २०१६ या कालावधीत कंपनीच्या प्रत्येक चुकांवर पांघरूण घालण्याचे काम औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

औषध नियंत्रक हरियाणा यांच्याकडून सहआयुक्त पुणे यांना ऑक्टोबर २००९ रोजी दिलेल्या पत्रामध्ये १७ हजार २५३ किलो पीसुडो इफेड्रीन एव्हॉन ऑरगॅनिक्स कंपनीस पाठविण्यात आले आहे, तो नष्ट केल्याची खात्री करावी, असे नमूद केले होते. या पत्राला उत्तर म्हणून तत्कालीन सहायक आयुक्त खडतरे यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये १० हजार ७६० पीसुडो इफेड्रीन कंपनीस प्राप्त झाला आहे. पत्रात नमूद केल्यानुसार हजार ५२२ किलो इफेड्रीनची तफावत आढळून आली.
या कारणामुळे ठरले अधिकारी दोषी...
१. औषधे सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार २००९ ते २०१६ या कालावधीत कार्यक्षेत्रातील औषध निरीक्षकांनी केलेल्या सर्व तपासण्यांचे अहवाल नियंत्रण प्राधिकारी यांना सादर करण्यात आले नाहीत. सोलापूर अन्न औषध कार्यालयाने आस्थापनेची तपासणी केली का ? अहवाल का पाठविला नाही ? तपासणीमधील त्रुटीवर उपाययोजना करण्यात आली का ? याबाबत नियंत्रण प्राधिकारी यांनी अहवाल मागविला नाही. वरील कालावधीतील तपासणीबाबतचा अहवाल सोलापूर कार्यालयात मिळाला नाही.
२. नार्कोटिक ड्रग्ज सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्यानुसार संबंधित कार्यक्षेत्रातील औषध उर्वरितपान वर
निरीक्षकसहायक आयुक्त यांनी नियमित तपासणी करणे अपेक्षित हाेते, मात्र अशी कोणतीही तपासणी झाले नसल्याचे दिसून येते.

३. १६ फेब्रुवारी २०१३ रोजी औषध निरीक्षक भाग्यश्री कदम सहायक आयुक्त साक्रीकर यांनी केलेल्या तपासणीमध्ये २०११ २०१२ या वर्षात पेसुडो इफेड्रीन या औषधाचे उत्पादन केले नसल्याचे नमूद आहे. कंपनीने सलग वर्षे उत्पादन करीत नसल्याचे निदर्शनास येऊनही याबाबत संबंधित कंपनीस परवाना परत करण्याबाबत कोणतीही नोटीस वा सूचना केल्याचे दिसत नाही.

४. २००९ पूर्वी झालेल्या तपासणीमध्ये उत्पादन विभागात सक्षम तांत्रिक व्यक्ती आवश्यकतेनुसार नाहीत, हे स्पष्ट नमूद असताना तत्कालीन सहायक आयुक्तांनी याची कोणतीही दखल घेतली नाही.
५. एव्हॉन ऑरगॅनिक्स कंपनीला दिलेल्या परवान्यामध्ये पीसुडो इफेड्रीन बेस पीसुडो इफेड्रीन टन्नेट या उत्पादनाचा समावेश नसताना या दोन्हीचे कंपनीमध्ये उत्पादन केल्याचे दिसून येते. कंपनीने ादर केलेल्या ०९ फिनिश्ड प्रोडक्टच्या यादीमध्ये वरील दोन्ही इफेड्रीनच्या साठवणुकीचे तपशील नमूद आहेत. या बेकायदेशीर कृत्याची तत्कालीन सहायक आयुक्तांनी कोणतीही नोंद घेतली नाही.

६. सहायक आयुक्त साक्रीकर औषध निरीक्षक भाग्यश्री कदम यांनी २०१३ पर्यंत संबंधित कंपनीची तपासणी केली, मात्र तपासणीनुसार कायद्यांतर्गत तरतुदींची अंमलबजावणी केली नाही. काही निरीक्षणे नोंदवून कंपनीच्या चुकांकडे दुर्लक्ष केले आहे. दोन्ही अधिका ऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

७. सप्टेंबर २००८ ते जानेवारी २०१६ पर्यंतच्या अहवालामध्ये प्रशासनाची मंजुरीच नसलेल्या कंपनीकडील इफेड्रीनचा स्टॉक सारखाच दाखविण्यात आला आहे. साडेसात वर्षानंतरही कंट्रोल्ड सबस्टेन्सची मुदत संपली का ? याची खातरजमा करण्याची प्रशासनाची जबाबदारी असताना त्यांनी याकडे तत्कालीन सहायक आयुक्त मनीषा जवंजाळ पाटील यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले.
बातम्या आणखी आहेत...