आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमार म्हणजे भारताची कथा; अमृतमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपतींचे गाैरवाेद‌्गार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- निरक्षरता,दारिद्र्याची पार्श्वभ्ूमी असताना कोणतेही कार्य करणे अवघड असते. पण या सर्वावर मात करून सुशीलकुमार शिंदे यशस्वी झाले. ते संघर्षमय व्यक्तिमत्त्व आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहेत. कोणत्याही कटुत्वाविना ते देशातील सर्वाेच्च पदांपर्यंत पोहोचले.

एका अर्थाने त्यांची कथा ही भारताची कथा असल्याचे गौरवोद‌्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. राष्ट्रपतींच्या हस्ते सोलापुरात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार रविवारी झाला. त्यात राष्ट्रपती म्हणाले, शिंदे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार जसा आज पार पडला तसा त्यांचा शताब्दी सोहळाही पार पडावा.

गरिबी, दारिद्र्यामुळे पडेल ते काम केले. इच्छा असेल तर मार्ग जरूर दिसतो. त्यामुळे तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. आपल्या राजकीय जीवनात पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी मोलाची साथ दिली. तसेच सोलापूरच्या जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

शरद पवार : सुशीलकुमार शिंदे हे स्वकर्तृत्व स्वकष्टाने उभे राहिलेले नेतृत्व. ते देशातील नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे. सोलापूरकरांनी पाठविलेले नेतृत्व देशातच नव्हे तर परदेशातही अापल्या कार्याने नावलौकिक करून त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केले.

देवेंद्र फडणवीस : अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर आपल्या कर्तृत्वाने एक व्यक्ती असामान्य कार्य करू शकते, हे शिंदे यांनी दाखवून दिले. विषम परिस्थितीवर मात करत त्यांनी दिलेला लढा, त्यातून घडविलेले स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रेरणा देणारे आहे.
सुशीलकुमार शिंदे काय म्‍हणाले...
- शरद पवार हे विद्वान आहेत, पण ते कुणाचीही चड्डी सहज ओढू शकतात.
- प्रणव मुखर्जी यांनी मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले.
- महाराष्ट्रातून एकदा माणूस दिल्लीत गेला की तो परत येत नाही.
- शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.
- तरूणांनी जे मिळेल ते काम केले पाहिजे.
- राष्ट्रपतींनी कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली म्हणून वाढदिवस साजरा करायला होकार दिला.
- ज्‍या सोलापूरात मी आइस्‍क्रीम, बुढी की बालचा डब्‍बा घेऊन मी विना चप्‍पलेचा फिरलो तिथे हा सोहळा पाहून कृतज्ञ झालो.
- आज मला इतिहासा आठवतो.
- लहानपणी मी वाडी हॉस्पिटलच्‍या कर्मचारी सोनूबाई यांच्‍या मुली सांभाळत होतो.
- त्‍यांच्‍या मुली आज येथे आहेत.
- त्‍या घरात मी शुद्ध भाषा शिकलो.
- 40 वर्षांच्‍या राजकीय जीवनात मी कधी साजरा केला नाही. ज्‍या घरातून, गरिबीतून, सामाजातून मी आलो त्‍या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्‍याची परंपरा नव्‍हती.
- पण, नंतर वाढदिवस साजरा करण्‍याचा आग्रह होत होता.
- त्‍यावेळी पत्‍नी आणि कुटुंबासोबत मी बाहेर जात असे.
- माझ्या सगळ्या मित्रांनी या सोहळ्याचे आयोजन केले. त्‍यांनी सुरुवातीला राष्‍ट्रपतींना आमंत्रण दिले. त्‍यांनी आंमत्रण स्‍वीकारल्‍यानंतर मला आंमत्रण दिले.

शरद पवार काय म्‍हणाले...
- माजी केंद्रीय शरद पवार म्‍हणाले, सुशीलकुमार नोकरी करत होते. त्‍यांच्‍यात मला महाराष्‍ट्राचे नेतृत्‍व दिसले.
- शिंदेसाहेब आता 75 आली, आपण दोघांनी आता जरा जपून वागायला हवे, शरद पवारांचा चिमटा
- सुशीलकुमार शिंदेंना राज्यात तिकीट दिले, पण दिल्लीतून तिकीट कापल गेल दिल्ली म्हणजे मोठी गमतीशीर नगरी आहे, चिंता होती नोकरी सोडली होती पण त्यांच नशिब जोरदार, त्यांच्या ऐवजी ज्यांना तिकीट मिळाले त्यांचे दुर्दैवाने निधन झाले आणि सुशीलकुमाराना तिकिट मिळाले
- तेव्हा मी सोलापूरचा पालकमंत्री होतो
- पुण्यात आलो तेव्हा माझ्या लक्षात आले हे व्यक्तीमत्व साध नाही व काँग्रसने संधी दिली तर मोठ काम करतील.
- त्‍यांना नोकरी सोडायला लावून मी राजकारणात आणले.
- मात्र, दिल्‍लीकरांनी त्‍यांचे तिकीट कापले.
- मला सुशीलकुमारांत महाराष्‍ट्राचे नेत्‍वृत दिसले; पण दिल्‍लीकरांना दिसले नाही
- आजचा दिवस सुशीलकुमारांच्‍या आयुष्‍यात महत्‍त्‍वाचा तसा तुमच्‍या आमच्‍या आयुष्‍यात महत्‍त्‍वाचा राहणारा दिवस - शरद पवार
कार्यक्रमाला सुरुवात....
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे व उज्ज्वला शिंदे यांचा पुष्पगुच्छ शाल मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
- काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल विद्यासागर राव, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवराजपाटील चाकूरकर, प्रफुल पटेल, डी वाय पाटील, पी चिदंबरम मंचावर उपस्थित आहेत.

शनिवारी झाली रिहर्सल
शनिवारी दुपारी विमानतळ ते पार्क चौक या मार्गावर वाहन ताफ्यांची रिहर्सल झाली. राष्ट्रपतींचा वाहनताफा जाताना जागोजागी पोलिसांचा लागणारा बंदोबस्त, ताफ्यातील बीडीडीएस पथक, जॅमर वाहन, अग्निशामक दल, वैद्यकीय पथक, सुरक्षा यंत्रणा वाहनांची रिहर्सल झाली. किती मिनिटात वाहनताफा विमानतळ ते पार्क मैदानावर पोहोचेल याचा अंदाज घेण्यात आला. काही काळ वाहतूक बंद होती. पन्नास ते शंभर मीटर अंतरावर दुतर्फा पोलिस पॉइंट लावले होते. दुपारी तीनच्या सुमाराला विमानतळावरून ताफा निघाला. साधारण वीस ते पंचवीस मिनिटात ताफा मैदानावर आला.
फोटो - दत्तराज कांबळे
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अमृतमहोत्‍सवी सोहळ्याचे क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...