आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Rangabhoomi Din Article By Professor Ganesh Medegaonkar

मराठी रंगभूमी दिन: राज्य नाट्य स्पर्धांच्या पलीकडे खूप काही आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिरुची संपन्न समाज निर्माण करावयाचा असेल आणि सांस्कृतिक चळवळ हेच त्याचे माध्यम ठरवायचे असेल तर या स्पर्धेत सादर होणारी संहिता आणि त्या संहितेची समकालीन मूल्ये ही विविध माध्यमातून समाजातील प्रत्येक कलाप्रेमीत रुजवली पाहिजेत. उदा.- सोलापूर केंद्रात सादर होणारी नाटके, त्यांची संहिता, सादरीकरणातील नावीन्य, दिग्दर्शकाचे विचार स्पर्धेआधी रसिकांत उत्सुकता निर्माण करण्यास किंवा स्पर्धेनंतर सर्व रसिकांसमोर थोडक्यात का असेना परंतु भूमिका ही स्पष्ट झालीच पाहिजे.

आंतरराष्ट्रीय नाट्य प्रवाहांचा राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नाटकांवर खरेच प्रभाव पडतो का? नवं काही नवीन कलावंत मंडळी आत्मसात करतात का? आत्मसात करून सादर केली, अंमलात आणली तर स्पर्धेत त्याचा विचार परीक्षक करतात का? स्पर्धेमध्ये नेहमीच परीक्षकांच्या गुणवत्तेवर क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अशा विषयांचा एकत्रित विचार नवीन पिढी करत असते. त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही भूमिका मांडत आहे.

केवळ अभिनेता सादरीकरण म्हणजेच नाटक नसते. संहिता लेखन, विषय नेपथ्य, रंगमंचीय वावर आणि उपयोग संगीत, प्रकाश योजना, कपडेपट, अभिनय अशा विविधांगी पद्धतीने नाटक सादर होते. याची एक कार्यशाळा सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आपण घेतली तर? राज्य नाट्य स्पर्धा समाप्तीनंतर काही अभिजात कलाकृतींचे, विशेषत: इतर भाषांतील जे मराठीत अनुवादित झाले आहे, याचे सादरीकरण केले तर? या प्रश्नांची उत्तरे मला आपणाकडून अपेक्षित आहेत. व्यावसायिक नाटक म्हणजे केवळ विनोदीच का? व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक हा भेद कशासाठी? कलावंतांनी नाटक पाहावे, नाटक आत्मसात करावे. ते रसिकांनी पहावे, आत्मसात करावे, नवे ते रंगमंचावर आणावे.