आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • March Ending Harry, 2.50 Crores Work Sanction Before Committee

मार्च एण्डिंगची घाई; २।। कोटींची कामे मंजुरीसाठी सभागृहापुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जानेवारी महिन्यातील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याची पाइपलाइन, शौचालय, रस्ता, भूमिगत गटार, स्टडी सेंटर आदी कामांसाठी अडीच कोटी रुपये खर्चाच्या मंजुरीचा विषय पाठवण्यात आला आहे. त्यातील पावणेदोन कोटींची कामे आयुक्तांनी पाठवलेली आहेत. याशिवाय महिला बालकल्याण समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांसाठी २९ लाखांची कामे मंजुरीसाठी आहेत. याशिवाय सेवानिवृत्त सहायक आयुक्त ए. ए. पठाण यांना मानधनावर नगरसचिव पदावर सेवेत घेण्यासह इतर प्रस्ताव सभासदांनी दिलेले आहेत.

जानेवारी महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. १९) दुपारी साडेचार वाजता महापौर सुशीला आबुटे यांनी बोलावली आहे. महापालिका सभागृहात १५ सभासद प्रस्ताव आहेत. कर्णिकनगरातील चिल्ड्रन पार्कला महात्मा बसवेश्वर नाव देणे, मनपा उर्दू शाळा क्रमांक ही शाळा फौजिया ट्रस्टला देणे, होम मैदान सिद्धेश्वर मंदिर समितीस देणे, एनटीपीसी जलवाहिनीची माहिती घेणे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान देणे आदी विषयांचा समावेश आहे.