आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया राबवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाजारसमितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १७ ऑक्टोबर २०१६ रोजी संंपते. नियमानुसार सहा महिने आधीच निवडणूक प्रक्रिया सुरू होणे, अपेक्षित आहे. मात्र अद्यापही निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया राबवली नाही. याबाबत आपण स्वत: लक्ष घालून बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे निवेदन खुद्द विद्यमान सभापती माजी आमदार दिलीप माने यांनी संचालक मंंडळातील सदस्यांसह जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनामध्ये बाजार समिती संचालकांची मुदत संपण्याच्या सहा महिने आधी मतदारयादीची फेरतपासणी केली पाहिजे. म्हणजेच १७ एप्रिल २०१६ रोजी फेरतपासणी होणे अपेक्षित आहे. अपर जिल्हाधिकारी यांनी जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक यांना याद्या सादर करण्याविषयी पत्र दिले होते. मात्र अद्यापही मतदारयाद्या अप्राप्त आहेत. बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यासाठी मतदार याद्या सादर करण्यासंबंधी आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत, अशी मागणी सभापती माने यांनी केली आहे. बाजार समितीने व्यापारी, हमाल तोलार मतदारसंघाच्या याद्या तयार केल्या आहेत. मतदार याद्या सादर करण्याबाबत दक्षिण उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी, उत्तर दक्षिण सोलापूर सहायक निबंधक यांच्याकडून विलंब केला जात आहे. बाजार समिती निवडणूक निवडणूक वेळेत व्हावी, यासाठी आपण त्वरित आदेश द्यावेत, असे निवेदनामध्ये नमूद केले आहे.
प्रशासक नियुक्तीच्या हालचाली...
बाजार समितीची निवडणूक वेळेत व्हावी, असे निवेदन सभापती माने यांनी जिल्हाधिकारी यांना दिले तर दुसरीकडे बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली वरिष्ठ स्तरावरून सुरू आहेत. माजी उपसभापती राजशेखर शिवदारे यांनी िदलेल्या तक्रारीवरून संचालक मंडळाची चौकशीही करण्यात आली. या चौकशी अहवालाचा आधार घेत बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...