आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद स्मृतिदिन: वर्षभरात देशात 379 पोलिस अधिकारी, कर्मचारी शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असताना वर्षभरात ३७९ पोलिस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले अाहेत. त्यांना शनिवारी अादरांजली वाहण्यात आली. सोलापुरात पोलिस मुख्यालयातील शहीदस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात अाले. 
 
२१ अाॅक्टोबर हा दिवस शहीद पोलिस स्मृतिदिनानिमित्त इंडीयन नेव्हीचे निवृत्त कॅप्टन प्रवीण पानसे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात अाले. पोलिस अायुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीणचे उपअधीक्षक संदीप नेटके यांच्या नेतृत्वाखाली परेड झाली. तीन वेळा बंदुकीच्या फैरी हवेत झाडून सलामी देण्यात अाली. 
 
सहायक निरीक्षक रईसा शेख फौजदार सोमनाथ देशमाने यांनी शहीद झालेल्या पोलिसांच्या नावांचे वाचन केले. जेल रोड पोलिस दलात कार्यरत असताना सोलापुरात १९६७ मध्ये झालेल्या दंगलीत भीमाशंकर लाड हे शहीद झाले होते. त्यांचा मुलगा सदाशिव लाड, सून पुष्पा, नातू भीमाशंकर हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनीही स्मृतीस पुष्पचक्र अर्पण केले. 
 
विविध फोर्समधील शहीद पोलिस 
बीएसएफ- ४६, सीअायएसएफ - १३, सीअारपीएफ - ४८, एफएससीडी एचजी - ६, अायटीबीपी - ११, एनसीबी - १, एनडीअारएफ - २, एसएसबी - ११ 
बातम्या आणखी आहेत...