आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेत मॅटिंग सीसीटीव्ही बसवणे राहील बंधनकारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाने आयोजित बैठकीत मंदिर समितीने यात्रा कालावधीत होम मैदानावरच्या धुळीचे प्रमाण कमी करण्यास मॅटिंग, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास आवश्यक त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे. शिवाय होम मैदान इतर ठिकाणावर स्टॉल उभारणीचा आराखडा आठ दिवसांत सादर करावा, अशा सूचना प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मंदिर समितीस केल्या.
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यंदा दीड महिना पूर्वीच मंदिर समिती, पंचकमिटी, महापालिका, पोलिस यांच्यासह सर्वच शासकीय प्रमुखांची बैठक बोलावली होती. बैठकीस पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा वालावलकर, तहसीलदार हणमंत कोळेकर, रघुनाथ पोटे, महापालिकेचे गंगाधर दुलंगे, बांधकाम विभागाचे किशोर साळुंके, देवस्थानचे धर्मराज काडादी, गुंडप्पा कारभारी, आर. एस. पाटील, व्ही. एस. आळंगे, चिदानंद वनारोटे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. होम मैदान मंदिर परिसरात आपत्कालीन मार्ग काेणता असावा ? यावरही चर्चा करण्यात आली. मार्केट पोलिस चौकी ते हरिभाई प्रशाला हा रस्ता नव्याने करण्यात आला आहे. हा रस्ता आपत्कालीन मार्ग म्हणून वापर करण्यात येणार आहे. शिवाय होम मैदानावरील धुळीचे लोळ कमी करण्यासाठी मॅटिंग करावे, यामध्ये संबंधित स्टॉलचा परिसर हा स्टॉलधारक तर इतर ठिकाणची जबाबदारी मंदिर समितीने घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

मागील वर्षी झाला होता मॅटिंगवरून वाद
मागीलवर्षी जिल्हा प्रशासनाने मॅटिंग, सीसीटीव्ही, आपत्कालीन मार्ग याबाबत दिलेल्या आदेशाची अंमबजावणी मंदिर समितीने केल्याने वाद निर्माण झाला होता. यंदा यात्रेच्या एक महिना अधी सूचना केल्या आहेत.

प्रदक्षिणा मार्गाची पाहणी...
बैठकी नंतरसर्वच विभाग प्रमुख मंदिर समितीचे पदाधिकाऱ्यांनी शहरातील ६८ लिंगांची पाहणी केली. प्रदक्षिणा मार्गावरच्या अडचणी दूर करण्यास संबंधित विभागाला सूचना देण्यात आली. अडथळा ठरणारे अतिक्रमण, रस्त्यावरचे खड्डे, विजेच्या तारा, झाडाच्या फांद्या आदींची पाहणी करण्यात आली. ज्या बाबी अडथळा ठरतील, त्या तातडीने दूर करण्याचे आदेश महापालिका, महावितरण संबंधित विभागाला देण्यात आले. शिवाय वाहतूक मार्गात आवश्यकतेनुसार बदल करण्याचा विचार प्रदक्षिणा मार्ग पाहणीनंतर करण्यात आला.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक...
सोमवारी जिल्हा प्रशासन मंदिर समिती यांच्यात प्रारूप आराखड्यावर चर्चा करण्यात आली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत यात्रेचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रारूप आराखड्यात काय बदल अपेक्षित आहेत? हे सुचवण्याच्या सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या आहेत. मंदिर समितीने स्टॉलचा आराखडा आठवडाभरात द्यावा, अशा सूचना प्रांताधिकारी पवार यांनी मंदिर समितीला केल्या आहेत.