आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडीच्या पूर्वसंध्येला भाजपमध्ये उफाळलीय गटबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराच्या ३२ व्या महापौर म्हणून शोभा बनशेट्टी उपमहापौपदासाठी शशिकला बत्तुल यांचे पारडे जड अाहे. त्यांची निवड जवळपास निश्चित अाहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर भाजपातील एका गटाच्या नगरसेवकांनी महापौरपदाच्या कालावधीवरून श्रेष्ठींनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शहराध्यक्ष निंबर्गी यांचा राजीनामाही मागितला गेला. यावर बुधवारी सकाळच्या बैठकीत तोडगा निघणार अाहे. 
 
बुधवारी सकाळी ११ वाजता कौन्सिल हाॅलमध्ये महापौर उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार अाहे. नव्या महापौर, उपमहापौर सदस्यांसाठी महापालिकेची दालने सजली असून, महिला दिनाच्या मुहूर्तावर दोन्ही मोठ्या पदावर महिलाच विराजमान होण्याचा योग बुधवारी जुळून येणार अाहे. 
 
संख्याबळ पाहता भाजपच्या शोभा बनशेट्टी आणि शशिकला बत्तुल यांची निवड होणार हे निश्चित आहे. दुपारपर्यंत निवड जाहीर होईल. त्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायीचे १६, परिवहन समितीचे १२ सदस्य पक्षीय बलाबलानुसार निवडण्यात येणार अाहेत. 
 
‘स्वीकृत’साठी इच्छुक 
महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच असून, भाजपचे दोन किंवा अन्य कोणाचा पाठिंबा मिळाला तर तीन सदस्य जातील. त्यासाठी अविनाश महागावकर, मुन्ना वानकर, प्रभाकर जामगुंडे, प्रा. अशोक निंबर्गी, श्रीनिवास दायमा यांची नावे चर्चेत आहेत. जुन्या नव्यांचा संगम करण्यासाठी विश्वनाथ बेंद्रे यांचाही विचार होऊ शकतो. परिवहन नको स्वीकृत नगरसेवकपद द्या, असे साकडे जामगुंडे यांनी घातले अाहे. काँग्रेसकडून अॅड. यू. एन. बेरियांसह दहाजणांची नावे चर्चेत अाहेत. सेनेकडून लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, प्रताप चव्हाण यांच्यासह अन्य नावे पुढे येत आहेत. 
 
त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार 
ते आमच्यापक्षाचे नगरसेवक अाहेत. ३५ नगरसेवक एकत्र आले असतील. पण त्यांची तक्रार आमच्यापर्यंत आली नाही. महापौर पदाचा कार्यकाल निश्चित करण्याचा अधिकार मला नाही. पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना आहे. पक्षाचे निरीक्षक संभाजी पाटील निलंगेकर यांनी आल्यावर त्यांच्यासमोर भूमिका स्पष्ट झाली आहे. पुढील निर्णय पालकमंत्री मुख्यमंत्री घेतील. माझा राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार आहे.'' प्रा.अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष 
 
पक्षांतर्गत गटबाजी उफाळली 
महापौरपदाचा उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेनंतर भाजपातील दोन गट अामने-सामने अाले अाहेत. नव्याने निवडून आलेले ३५ नगरसेवकांचा एक गट मंगळवारी एमआयडीसी भागातील नगरसेवक शिवानंद पाटील यांच्या घरी एकत्र जमला होता. महापौरांचा कार्यकाल सव्वा वर्षासाठी निश्चित करा, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांना पदावरून हटवा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी दहा वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना भेटणार आहेत. 

महापालिकेत भाजप स्वबळावर प्रथमच सत्तेत विराजमान होणार अाहे. तिकीट वाटपापासून महापौर ठरवण्यापर्यंत गटबाजी झाल्याने ३५ नगरसेवकांचा एक गट एकत्र आला. मंगळवारी नगरसेवक पाटील यांच्या घरी बैठक झाली. नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, सुनील कामाठी, मंगला पाताळे, अंबिका पाटील, विजयालक्ष्मी गड्डम, श्रीकांचना यन्नम, अमर पुदाले, रवी गायकवाड, राजश्री कणके आदी उपस्थित होते. महापौर पदाचे उमेदवार शोभा बनशेट्टी, उपमहापौर पदाचे उमेदवार शशीकला बत्तुल, नागेश वल्याळ, अविनाश बोमड्याल, संगिता जाधव, राजेश काळे, राजश्री बिराजदार, अमृता चव्हाण, मनीषा हुच्चे, राजश्री चव्हाण, श्रीनिवास करलीसह १४ नगरसेवक या बैठकीत नव्हते. 
 
महापौरांचा कार्यकाल निश्चित करून १५ महिन्यांचा करा. तशी घोषणा पक्षाकडून करण्यात यावी, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी हे गटबाजी करत असून, त्याचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात आली. याबाबत निर्णय घेतल्यास महापालिकेतील कोणतेही पद घेणार नाही, अशी भूमिका या गटाकडून घेण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस प्रभाकर जामगुंडे यांना नगरसेवकांनी भावना कळवल्या. त्यांनी पक्षापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जाते. हा गट विजय देशमुख यांना मानणारा आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पालकमंत्री देशमुख यांना ३५ नगरसेवक भेटणार आहेत. त्यानंतर महापौर निवडीच्या मतदानास जातील. 
परिवहन समिती सदस्य 
 
बातम्या आणखी आहेत...