आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीअायच्या वेबसाइटचा वैद्यकीय विद्यार्थ्यांना लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील खासगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी सर्व माहिती (एमसीआय) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला पाठविणे बंधनकारक केले आहे. पूर्वी मात्र बंधन नव्हते.आता वैद्यकीय महाविद्यालयांना खरी माहितीच द्यावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. जगभरातील वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती विद्यार्थांना एमसीआयच्या वेबसाइटवर घरबसल्या बघायला मिळणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता राजाराम पोवार यांनी दिली.
महाविद्यायलात असलेल्या विभाग, शिक्षक, कर्मचारी, सर्व पायाभूत सुविधांची माहिती दिली जाईल. पदवी पदव्युत्तर विभागासाठी असलेली प्रवेश क्षमता याचीही माहिती एमसीआयला सादर करणे आवश्यक आहे. महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या रुग्णालयांची माहिती तेथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहितीही अपडेट द्यावी लागणार आहे. त्यामुळे जगातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना घरबसल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या विषयासाठी शिक्षक आहेत की नाहीत, होस्टेल सुविधा कशी आदी माहितीमुळे प्रवेश घेण्यास सोईस्कर होणार आहे. बऱ्याचदा काही प्राध्यापक एक ते दोन ठिकाणी शिकविण्याचे काम करत होते असे एमसीआयच्या निर्दशनास आल्यामुळे त्यांनाही चाप बसणार आहे. असेही डॉ. पोवार म्हणाले.

अर्ज भरण्याची प्रक्रिया
विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरावा. या पूर्ण भरलेल्या अर्जाची छापील प्रत घ्यावी. राज्यातील कोणत्याही आयटीआय संस्थेत कागदपत्रं तपासून प्रवेश अर्ज शुल्क भरावे. प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर पुन्हा ऑनलाइन रजिस्ट्रेशन क्रमांक, पासवर्डद्वारे लॉग इन करावे. अभ्यासक्रमांचे संस्थांचे पर्याय द्यावेत. ही सर्व प्रक्रिया जास्तीत जास्त १० जुलैपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
२८ जूनपर्यंत प्रक्रिया सुरू, नंतर कौन्सिलिंग राऊंड
सोलापूर जेईईअॅडव्हान्स परीक्षेत शहरात १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश पटकाविल्याने यंदा आयआयटी प्रवेशाच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. जेईई अॅडव्हॉन्स परीक्षेत उत्तम यश पटकाविलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता चॉईस देण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे. २८ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. यानंतर काैन्सिलिंग राऊंड असेल. यंदा शहर जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्समध्ये उत्तम यश पटकावले. आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटीसह अन्य संस्थांमध्ये यंदा एकूण ७०७ जागा वाढवण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षी ३४ हजार ०७४ जागा होत्या. यंदा त्या ३४ हजार ७८२ वर पोहोचल्या आहेत. या जागांसाठी ऑनलाइन चाॅइस फिलिंगची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होईल, असे जेईई अॅडव्हान्सच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले.

प्रवेश फेरी प्रारंभ अंतिम
ऑनलाइन अर्ज २७ जून १० जुलै
अर्ज निश्चित २७ जून ११ जुलै
गुणवत्ता यादी १२ जुलै
बातम्या आणखी आहेत...