आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेत पेटले "पाणी', सत्ताधारी- विरोधकांत ५५ मिनिटे रंगले वगनाट्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाणी नियोजनासंदर्भातील भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांच्या लक्षवेधीवरून सभागृहात पाण्यानेच जणू पेट घेतला. जाच, चमचेगिरी, बालीशपणा अशी शेलकी शब्दफेक झाल्याने सत्ताधारी विरोधकांत चांगलीच जुंपली. पाणी नियोजनावरील चर्चेपेक्षा मानापमानावरच सभागृहाची ५५ मिनिटे वाया गेली. दरम्यान, सात रस्ता येथील सिटी बस डेपोसाठी अारक्षित असलेल्या भूखंडाचे अारक्षण उठवण्यास भाजप नगरसेवकांनी कडाडून विरोध करूनही सत्ताधारी गटाने अारक्षण बदलण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. अामदार भारत भालके यांच्या पाणी लढ्याचे कौतुक झाले.

महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापौर सुशीलाअबुटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात अाली. सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या सभेच्या सुरुवातीलाच जगदीश पाटील यांनी पाणीप्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली. २० वर्षांपासून पाठपुरावा करीत अाहोत, पण नियोजन शून्यच असल्याचा अारोप त्यांनी केला. अधिकारी गंगाधर दुलंगे यांनी दिवसाला पाणीपुरवठा असताना अ,ब,क,ड असे चार भाग तर दिवसाला पाणीपुरवठ्यामुळे पाच भागात पाणी वाटप करता येईल असा मार्ग सुचविला. आनंद चंदनशिवे यांनी कालच्या बैठकीत एक बोलता आणि आज एक बोलता म्हणत वादाला सुरुवात केली.

यांनी शहराची तहान किती आपले वितरण किती विचारल्यावर अधिकाऱ्यांनी दिवसाकाठी १३५ एमएलडी उपसतो तर ७५ एमएलडी पिण्यासाठी वितरीत करीत असल्याचे सांगितले. दोन दुवसांपूर्वी पाणी वाया गेल्याप्रकरणी उपअिभयंता यलगुलवार यांना निलंबित करण्याची मागणी नगरसेवक नरेंद्र काळे सुरेश पाटील यांनी केली.
महापौर अाबुटे पाटील
विहिरी अधिग्रहण, सात रस्ता डेपोच्या जागेसंदर्भात सभागृहाचे वर्तन बालिशपणाचे आहे असे वक्तव्य पाटील यांनी करताच महापौरांनी, तुम्ही जास्त बोलू नका, आधी माफी मागा. अन्यथा तुम्हाला सभागृहातून बाहेर जावे लागेल, असे म्हणत बालीश कुणाला म्हणता, महिलांशी बोलायची अक्कल आहे का नाही? इथपर्यंत त्या बोलल्या.

अन्यही मांडले प्रस्ताव
शिकलगार यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, तडवळकर यांनी जेटिंग मशीन टप्प्याटप्प्याने प्रभागात देण्यात यावेत. चंदनशिवे यांनी एक दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्यांना महिला बालकल्याणमार्फत निधी ध्यावा, तसेच एव्हरेस्टवीर बनसोडे यास एक महिन्याचे वेतन देतो असे विषय मांडले.

राठोड काळे : माजीमहापौर अलका राठोड यांनी अशोक निंबर्गी नरेंद्र काळे यांच्यावर आक्षेप घेत तुम्ही मला जाच हा शब्द का वापरला, असा सवाल केला. भाजप नगरसेवकांनी आम्ही काही म्हणालो नाही असे सांगितले. राठोड यांनी महिलांना कसे बोलायची याची समज नाही, माफी मागा असा पवित्रा घेतला.

प्रस्ताव क्रमांक ३०३
याक्रमांकाने नगरसेवक दिलीप कोल्हे, चेतन नरोटे, बिस्मिल्ला शिकलगार दिपक राजगे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. सिटी सव्र्हे क्रमांक ७१०७ भाग आरक्षण क्रमांक ७/१३ अशी ही जागा असून जागा अश्विनी रुग्णालयालगत आहे.

रोहिणी तडवळकर-अनिल पल्ली
वादसुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेविका उठून उभारत सभा तहकूब करा म्हणाल्या. भाजपच्या तडवळकरांनी इतरांनी चमचेगिरी करू नका असे म्हणत वादात भर टाकली. पल्ली तडवळकर यांच्यात पुन्हा जुंपली.

जगदीश पाटील संजय हेमगड्डी
१७कोटींच्या विकासकामांच्या प्रस्ताव क्रमांक २८९ घ्यावा, या विषयाचा आग्रह जगदीश पाटील सुरेश पाटील यांनी धरला. पण सभागृह नेते हेमगड्डी यांनी विरोध केला. यावेळी पाटील आणि हेमगड्डीत लागली.