आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमेशचंद्र अग्रवाल यांच्या भेटीच्या सोलापूरकरांनी जागवल्या अाठवणी, जाणून घेतले होते प्रश्‍न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भास्करग्रुपने पाच वर्षांपूर्वी दैनिक दिव्य मराठीच्या रूपाने सोलापुरात पाऊल ठेवले. त्यानिमित्ताने एप्रिलच्या दरम्यान भास्कर ग्रुपचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल सोलापूर शहरात होते. त्या कालावधीत त्यांनी सोलापूरला अाणि सोलापूरच्या प्रश्नांना जाणून घेण्यासाठी शहरातील विविध घटकांतील मान्यवरांशी सलग तीन दिवस संवाद साधला होता.
 
अावृत्ती सुरू करीत असताना ते सोलापूरकरांशी स्थानिक विषयांशी एकरूप झाले पाहिजे, ही भावना घेऊन त्यांनी केलेला हा संवाद सोलापूरकरांना कायम स्मरणात राहील, अशा भावना शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
 
दैनिक दिव्य मराठी सोलापूर अावृत्तीचा प्रकाशन सोहळा ३१ मार्च २०१२ रोजी रंगभवन सभागृहात झाला. त्यासाठी रमेशचंद्र अग्रवाल उपस्थित होते. अात्ताच्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यातील मंत्री विजयसिंह मोहिते, तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते, तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे अादी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 
या वेळी केलेल्या भाषणात रमेशचंद्र अग्रवाल यांनी सोलापूरचा विकास, विमानसेवा, यंत्रमाग, उद्योग इत्यादी जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर अापली मते मांडली होती. सोलापूरचे हे प्रश्न सोडवण्यासाठी दैनिक दिव्य मराठी काम करेल, असे त्यांनी सांगितले होते. सोलापूरचा विकास करण्यासाठी प्रसंगी दादागिरी करा, असे ते सूचकपणे शिंदे यांना उद्देशून म्हणाले होते. सोलापूरच्या विकासकामांच्या पाठीशी अाम्ही सदैव राहू, असे त्यांनी सोलापूरकरांना त्यावेळी सांगितले होते.
 
अावृत्ती प्रकाशनाच्या तीन दिवस अगोदर अग्रवाल यांनी सोलापुरातील प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील डाॅक्टर्स, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, खेळाडू, अग्रवाल समाज अादी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी थेट संवाद साधला होता. तीन दिवस हसवले होते. त्यातून त्यांनी सोलापूरचे अनेक प्रश्न समजावून घेतले होते. सोलापूरची विमानसेवा सुरू झाली पाहिजे, यासाठी त्यांचा अाग्रह होता. त्या अाठवणी अनेकांनी अाज बोलून दाखवल्या.
 
बातम्या आणखी आहेत...