आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाला 2550 एफआरपीसह 200 रुपये वाढीव दर जाहीर; 100 रुपये पहिल्या उचलीसोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऊस दरावरून राज्यभरात पेटलेल्या आंदोलनानंतर कोल्हापुरातील बैठकीत तात्पुरता तोडगा निघाला. उसाला प्रतिटन २,५५० रु.एफआरपीसोबत २०० रुपयांचा वाढीव दर मान्य झाला. पहिल्या उचलीसोबत १०० रु. व उर्वरित १०० रुपये २ महिन्यांनी दिले जातील. शेतकरी संघटना उसाला ३,५०० रु.चा भाव देण्याची मागणी करत होत्या. 

शेतकरी संघटना व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटना आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.  या प्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनीही दर द्यावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. 
 
अंतिम निर्णय बुधवारी
हा तोडगा कारखाने व संघटनेतील आहे. अंतिम दर ८ नोव्हेंबरच्या ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीत काढण्यात येणार आहे. राज्यातील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. ऊस तोडल्यापासून १५ िदवसांत कारखान्यांनी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे बंधन साखर आयुक्तालयाने घातले आहे.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, बैठकीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...