आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘म्हाडा’च्या घरांसाठी दोन नोव्हेंबरर्यंत मुदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)ने सात रस्ता आणि जुळे सोलापुरात बांधलेल्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. ही मुदत ऑक्टोबरला संपली. आता नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल. मुदत वाढवण्याचे कारण देताना मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी लोकांचा आग्रह असल्याचे म्हटले आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की घरांचे दर महाग असल्याने त्याला प्रतिसादच नाही.
जुळे सोलापुरातील डी-मार्टच्या मागे आणि सात रस्त्यावरील अब्दुलपूरकर मंगल कार्यालयाजवळ ‘म्हाडा’ने १०९ घरे बांधली. त्याचे मात्र खासगी बिल्डरांपेक्षा अधिक ठेवले. सोलापूरसह पुणे आणि साताऱ्यातील घरे अाणि खुल्या भूखंडसाठी ऑनलाइन अर्ज मागवले. त्याचे दर पाहून सर्वत्र आेरड झाली. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लोक पुढे अाले नाहीत. आलेल्या अर्जातून २५ ऑक्टोबरला सोडत काढण्याचेही जाहीर केले होते. परंतु प्रतिसाद नसल्याचे पाहून मुदत वाढवली.

सुधारित कार्यक्रम
नोव्हेंबर: ऑनलाइनने अर्ज भरता येईल.
१७ नोव्हेंबर : प्रारूप यादीची प्रसिद्धी करणार.
१९ नोव्हेंबर : अपिलावर सुनावणी घेणार.
२४ नोव्हेंबर : पुण्यात सोडत काढणार
अधिक माहितीसाठी ‘म्हाडा लॉटरी २०१६’ या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा ९८६९९८८००० या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
बातम्या आणखी आहेत...