आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात ‘म्हाडा’ची घरे बिल्डरपेक्षा महाग; दर हजार रुपये स्क्वेअर फूट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सर्वसामान्यांना घरे देण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण असलेल्या पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) सात रस्ता आणि जुळे सोलापुरातील घरे विक्रीस काढली. परंतु त्यांचा दर खासगी बिल्डरांपेक्षा अधिक आहे. दोन्ही गृहप्रकल्पात ११९ सदनिका आहेत. त्यात अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबीयांना स्थान नाही. ज्याचे मासिक उत्पन्न २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनाच ही घरे लॉटरी पद्धतीने मिळतील.

सात रस्त्यावरील शिवाजीनगर येथील ‘म्हाडा’ कार्यालयाच्या जागेवर ४८ घरे बांधली. जुळे सोलापूरच्या डी-मार्टजवळ ७१ घरे साकारली. दाेन्ही प्रकल्प बहुमजली आहेत. घरे घेण्यासाठी मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऑक्टोबरपर्यंत ती चालणार आहे. २५ ऑक्टोबरला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सोडत काढण्यात येईल. पुणे, सोलापूर आणि सातारा येथील २५०३ घरे आणि ६७ भूखंड विक्रीची ही प्रक्रिया आहे. त्यासाठी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

हजार रुपये जादा
बांधकामव्यावसायिक एकूण बांधकाम क्षेत्रफळावर घराचे दर काढतात. परंतु ‘म्हाडा’ने चटई क्षेत्रफळावर दर निश्चित केले. सात रस्त्यावरील शिवाजीनगरात ४६.७० चौरस मी. चटई क्षेत्राचे घर २१ लाख ५७ हजार ३२० रुपयांना आहे. (चौरस फूटमध्ये दर हजार २९७ रुपये). जो बिल्डरांपेक्षा अधिक म्हणता येईल. सात रस्ता परिसरात जागांच्या किमती जवळपास हजार रुपये फूटपर्यंत आहेत. शिवाजीनगर अब्दूलपूरकर मंगल कार्यालयाच्या समोर झोपडपट्टीलगत आहे. तिथे हजार ते ३२०० रुपये फूट घरांचे दर आहेत.

‘म्हाडा’चा नफा नाही, छुपे दर नाहीत!
खासगी बिल्डरमंडळी केवळ घर देतात. त्यानंतर इलेक्ट्रिकची कामे, पाण्याची व्यवस्था करून घ्यावी लागते. पार्किंगची जागाही बिल्डरकडून विकत घ्यावी लागते. यासाठी अधिक पैसे लागतात. ‘म्हाडा’ने असे कुठलेही छुपे दर ठेवलेले नाहीत. नफादेखील पाहिलेला नाही. अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठीच ही घरे आहेत. अत्यल्प उत्पन्न गटांसाठी पंतप्रधान आवास योजना आहे. अशोककाकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा
बातम्या आणखी आहेत...