आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘म्हाडा’अधिकाऱ्यांनी केली घरकुलांच्या जागेची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुंभारीपरिसरात प्रस्तावित कामगारांच्या घरकुल योजनांसाठी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) च्या अधिकारी पथकाने जागेची पाहणी केली. त्यानंतर सातरस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. तीत बैठकीत योजना राबवण्यात काय अडचणी आणि उपाय यावर चर्चा झाली.

‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, कार्यकारी अभियंता विवेक पाटील, उपअभियंता रामतीर्थ डेसळे, मिळकत व्यवस्थापक श्री. ठाकूर आणि सोलापूरचे उपअभियंता मिलिंद अटकाळे या पथकात होते. बैठकीत ३० हजार लाभार्थ्यांचे अर्ज तपासण्यासाठी ‘म्हाडा’कडे पुरेसा मनुष्यबळ नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी उपस्थित केली.

शिवाय जागा महापालिका हद्दीबाहेर असल्याने पालिकेची यंत्रणा त्याची जबाबदारी कशी घेईल? असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर घरकुलांचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून ‘म्हाडा’ला घोषित केल्यास हे काम सोपे होईल, असे सूचवले. या वेळी हुतात्मा कुर्बानहुसेन गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख, मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष यशोदा दंडी, कुरमय्या म्हेत्रे, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, अमोल मेहता, वीरेंद्र पद्मा, विजयलक्ष्मी महेशन, नरेश दुगाणे उपस्थित होते.

‘रे’ नव्हे, ‘पे-नगर’
‘राजीव गांधी आवास योजना’ हे नाव बदलून केंद्राने आता ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण केले. कामगार घरकुल योजना या सहकार तत्त्वावर असल्या तरी त्या काँग्रेसच्या काळात ‘रे-नगर’मध्ये बसवण्याचे ठरले होते. आता योजनेचे नाव बदलल्याने ‘पे-नगर’मधून घरे साकारली जातील.