आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे काय केले आहे या शिक्षकाने की मायक्रोसॉफ्टचे CEO करणार आहेत त्याचा सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणजित डिसले, शिक्षक - Divya Marathi
रणजित डिसले, शिक्षक
माढा (सोलापूर)- परितेवाडी (ता. माढा, जि सोलापुर) या  ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेच्या रणजित डिसले या शिक्षकाने अनेक नवनवे आधुनिक शैक्षणिक प्रयोग केले आहेत. त्यापैकीच त्यांनी विकसित केलेल्या क्यु आर कोडेड आधुनिक शिक्षण प्रणालीबद्द्ल 7 नोव्हेंबर रोजी डिसले त्यांचा मायक्रोसाॅफ्टचे सीईओ सत्या नाडेल यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.
 
सीईओ सत्या नाडेला यांनी हिट रिफ्रेंशमेट नावाचे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात फक्त भारतातील तिघांचा समावेश आहे. त्या तिघांपैकी डिसले हे एक आहेत. तर दिल्लीचे एक शिक्षक व कोईम्बतुर येथील एक महिला डॉक्टर यांचा समावेश आहे. 
 
रणजित डिसले हे विद्यार्थ्यांना फळा आणि खडु एवढेच मर्यादित शिक्षण देत नसुन हायटेक युगाप्रमाणे विद्यार्थ्यांना ते आधुनिक शिक्षण प्रणाली विकसित करुन देत आले आहेत. मोबाईलचा शिक्षणासाठी कसा सकारात्मक वापर करता येऊ शकेल याचे चिंतन करुन डिसले यांनी पाठ्यपुस्तकासाठी क्यु आर कोड प्रणाली तयार केली. याचा प्रस्ताव त्यानी बालभारती  अर्थात पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे यांना व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ही क्यु आर कोड प्रणाली चा प्रस्ताव टपालाद्वारे पाठवला होता. त्यात क्यु आर कोड पध्दत पुस्तकात कशी वापरता येईल, याचे ही स्पष्टीकरणही पाठवले होते.
 
डिसले याचा हा नवा प्रयोग बालभारतीने स्वीकारला. गेल्या वर्षी सहावी इयतेच्या पाठ्यपुस्तकात तर यावर्षी 7 वी व 9 वी इयत्तेच्य  सर्व पुस्तकात या डिसले यांच्या क्यु आर कोड चा  वापर करण्यात आला आहे. राज्यातील 60 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यत क्यु आर कोड  प्रणाली जाऊन पोहचली आहे. या माध्यमातून प्रत्येक धड्यानुसार संबधित माहिती चित्रफिती  ऑनलाईन प्रश्नपत्रिका ही उपलब्ध आहेत.
 
क्यु आर कोड हे नवे तंत्र पाठ्यपुस्तकात वापरणारे महाराष्ट्र हे देशात एकमेव राज्य आहे. तंत्रस्नेही शिक्षक म्हणुन डीसले यांचा  या अगोदर मुख्यमंत्री, राज्यपाल, शिक्षणमंत्री यांच्या हस्ते त्याचा गौरव झाला आहे.

क्यु आर कोड कसे वापरले जाते-
मोबाईल मधील प्ले स्टोअर मधुन क्यु आर कोड स्कॅनर अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे पाठ्यपुस्तकावरील कोड स्कॅन करताच क्षणाधार्थ त्या पानावरील मजकुर दिसतो. कविता असल्यास ऐकायला येते.प्रत्येक धड्यानुसार माहिती या अॅप मध्ये  भरण्यात आली आहे.

अन्य 10  देशात ही  प्रस्ताव-
रणजित डिसले यांनी क्यु आर कोडचा प्रस्ताव जपान, कोरिया, थायलंड, अमेरिका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिनलंड, नेदरलॅड, ऑस्ट्रिया, इजिप्त या 10 देशाना ही पाठवला  आहे.
 
डिसले यांच्या या प्रयोगाची हिट रिफ्रेशमेंटसाठी निवड-
या प्रणालीचा राज्यातील तब्बल 60 लाख विद्यार्थी लाभ घेत आहेत. त्यामुळे या प्रणालीची मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी प्रयोगाची हिट रिफ्रेशमेंटसाठी निवड केली आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

   
 
बातम्या आणखी आहेत...