आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिडब्रेन अॅक्टिव्हेशनची भोंदूगिरी जोरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचते चौदा या वयोगटातील तुमच्या मुलामुलीला "दिव्य दृष्टी' हवी असल्यास केवळ आठ ते दहा हजार रुपयांत ती मिळवून दिली जाईल. तीही केवळ दोन दिवसांच्या प्रशिक्षणात. फरक इतकाच की त्याला दिव्य दृष्टी असे म्हणता "मिडब्रेन अॅक्टिव्हेशन' असे गांेडस नाव आहे. सोलापुरात दोन ठिकाणी असे अॅक्टिव्हेशन सेंटर सुरू आहेत. अर्थातच क्लास अधिकृत नाही. परंतु तो अधिकृत असल्याचे बिनदिक्कत सांगितले जाते. न्यूझीलंड ब्रँड, सिंगापूर ब्रँड असल्याचे सांगत भोंदूगिरी डेव्हलप झाली आहे.

मिडब्रेन अॅक्टिव्हेशन म्हणजे एक प्रकारची भंपकगिरी आणि फसवेगिरी आहे. याबाबत चौकशी व्हावी अशी तक्रार पोलिसांकडे देण्याचे धाडस केवळ एक-दोन जागरूक पालकांनी दाखवले आहे. पण तेवढ्यानेच ही दुकानदारी बंद होईल, अशी आशा बाळगण्यात अर्थ नाही.

डोळ्यांवर कापूस आणि काळीपट्टी बांधल्यानंतरही फटीतून थोडेफार दिसते. त्यातूनच ही मुले उत्तरे देतात, असे काही पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर पालकांनी याबाबतची प्रत्यक्ष शहनिशा केली. मुलांना या छोट्याशा फटीतून दिसल्यानंतरच उत्तरे मिळतात. काळी पट्टी क्लासवाल्यांनी दिलेलीच वापरायची. दुसरी पट्टी वापरली की मुले उत्तरे देत नाहीत, असेही दिसून येते.

विज्ञानाचीभाषा वापरत आधुनिक बुवाबाजी, पालक पडतात बळी
प्रत्येकपालकास आपली मुले हुशार व्हावीत, जिनिअस व्हावीत असे वाटत असतेच. त्यासाठी ते विविध क्लास लावतात. स्पर्धेत आपल्या मुलांनी इतरांपेक्षा अधिक चमकदार कामगिरी करून दाखवली पाहिजे या अट्टहासातूनच अशी दुकानदारी उदयास येते, हे समजून घेतले पाहिजे. मेट्रोसह इतर शहरांत ही भोंदूगिरी राजरोस सुरू आहे. विज्ञानाची भाषा वापरली की दुकानदारीचा धंदा जोरात चालतो.

असाअसतो क्लासवाल्यांचा तर्क
प्रत्येकामध्येउजवा डावा मेंदू असतो. या दोन्ही मेंदूंना जोडणारा पूल म्हणजे मिडब्रेन. तो विकसित केला की दोन्ही मेंदू अचाट कामगिरी करू लागतात. दृष्टीला दिसणारी वस्तू त्यांना डोळे बांधले तरी ओळखता येते. इतक्याच भांडवलावर ही दुकानदारी सुरू झाली आहे.

सुटाबुटातीललोकच करताहेत बुवाबाजी
जागतिकस्तरावर निकालात निघालेले प्रयोग सोलापुरात तडाख्यात सुरू आहेत. आधुनिक सुटाबुटातील लोकांनी सुरू केलेली बुवाबाजीच मानावी लागेल.

^मिडब्रेन अॅक्टीव्हेशनच्या संदर्भात केले जात असणाऱ्या दाव्याबाबत वेळोवेळी जागृती केली जाते. ही आर्थिक फसवणूक निश्चित आहे. आधुनिक भोंदुगिरी आहे. पालकांनी जागृत राहिले पाहिजे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती क्लासचालकाना त्यांच्या दाव्याची सत्यता सिद्ध करण्याचे आव्हान देत आहे. या प्रकरणाचा भांडाफोड अंनिस निश्चित करेल.'' नभाकाकडे,
जिल्हाध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर

या संदर्भात पोलिसांत लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्याचे वाटत असेल तर पोलिसांकडे संपर्क साधून तक्रार द्यावी. तक्रारीतील कायदेशीर बाबी तपासून कारवाई करता येईल.'' अश्विनीसानप, पोलीस उपायुक्त

फक्त डोळेनाही तर संपूर्ण चेहरा जाड कपडाने झाकला तरी दिसले पाहिजे. याची चाचणी घेतली तरी बिंग फुटेल. कारण डोळे नाक याच्या फटीतून दिसते. पूर्ण नियंत्रितपणे प्रयोग केले तर कोणालाही नजरेशिवाय पाहणे अशक्य असते, याची प्रचिती सहज येईल.

एकातक्रारदारपालकाने "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीसह सोलापुरातील दोन्ही केंद्रांना भेट दिली. प्रात्यक्षिकावेळी सर्व व्यवस्थित सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकाने पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने काळी पट्टी व्यवस्थित बांधली. काहीच दिसेनासे झाल्यानंतर मात्र मुले गोंधळली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानेच पोलिसांत लेखी तक्रारही देण्यात आली आहे.
Áदोनदिवसाच्याप्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना एक बॅग, दहा बॉल, काळी पट्टी, सीडी आदी साहित्य दिले जाते. हेच साहित्य आणि हीच काळी पट्टी वापरावी असा आग्रह धरला जातो.

सहावे इंद्रिय असूच शकत नाही
नसलेलेसहावे इंद्रिय जागृत करून त्याद्वारे अचाट स्मृती मिळवता येत असेल तर शिक्षण घेण्याची गरजच काय ? अॅडव्हान्स प्रशिक्षणानंतर तर पुस्तक केवळ नजरेच्या टप्प्यात ठेवून त्यातील उत्तरे धडाधडा उत्तरपत्रिकेत लिहिता येतील की. डॉक्टर, प्राध्यापक, वकील, अभियंता हवी ती परीक्षा सहज देता येईल. पण सहावे इंद्रिय जागृत करण्याची जागतिक स्तरावरील भाेंदूगिरी सोलापुरातही येऊन ठेपली आहे.

शहरात मिडब्रेन अॅक्टिव्हेशनचे वर्ग सुरू असतील तर हा विषय पोलिसांच्या अधिकार कक्षेेतील आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना या संदर्भात लक्ष घालण्याबाबत सांगितले आहे.'' तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी

अनेक दावे, उपाय एकच मिडब्रेन अॅक्टिव्हेशन
पहिल्याकोर्समध्ये स्पर्शाने ओळखता येते. दुसऱ्या कोर्सने पाठीमागील वस्तू ओळखता येईल. तिसऱ्या कोर्सने पुस्तक चाळले तरी जसेच्या तसे वाचू शकेल, इतका विकास होईल असा दावा होतो. असे असेल तर गतीमंद मुलांनाही तल्लख बनवता येईल. अंध व्यक्तीलाही सहज दिसू शकेल, पण तशी उदाहरणे नाहीत.

डोळ्यांवर पट्टी बांधली तरी वस्तू दिसतात, यावरून मिडब्रेन अॅक्टिव्हेट झाल्याचे समजावे. ही केवळ एक चाचणी आहे. याचा अर्थ दिव्य दृष्टी जागृ़त झाली असे नव्हे. यातून कोणाचीही फसवणूक नाही. प्रशिक्षणानंतर मुलांची स्मरणशक्ती जागृत होते. इतकेच नव्हे तर अंध व्यक्तींनाही याचा लाभ होतो. जागतिक स्तरावर मान्य झालेला हा कोर्स आहे. आमच्या क्लाससाठी केंद्र शासनाचीही मंजुरी आहे.'' सतीशमुलगे, संचालक, सीमास अकॅडमी, आजोबा गणपतीजवळील कार्यालय

मिडब्रेन अॅक्टिव्हिटी जागृतीसंदर्भात मी आज प्रतिक्रिया देत नाही. बाहेरगावी आहे. मंगळवारी येणार आहे तेव्हा बोलतो.'' डॉ.ढगे, संचालक, मिडब्रेन अॅक्टिव्हेशन, बचपन नर्सरी सीरत नगर जवळ

पालकांची मुलांची फसवणूकच केली जात आहे. हे वेळीच थांबले नाही तर याचे लोण सगळीकडे पसरेल. यू ट्यूब मिडब्रेन अॅक्टिव्हेशनबाबत भुरळ टाकून फसवणूक केली जाते. जागृतीनंतरच अशा बाबींवर आळा बसू शकतो.'' नागेशमस्के, बुधवार पेठ, तक्रारदार

मुले डोळे बंद करून रंग, आकार, नंबर ओळखू शकतात. वृत्तपत्र वाचतात. नुसते पुस्तक चाळले तरी त्यातील ७५ टक्के मजकूर ही मुले जशीच्या तशी पुन्हा तोंडी सांगू शकतील असा अॅडव्हान्स कोर्सही निघालाय. अतिरंजित वाटत असले तरी दावा असाच केला जातो.
स्मृती, एकाग्रता, चटकन ओळखण्याची क्षमता, सहावे इंद्रिय विकसित करण्याचा हा दावा भ्रामक आहे. अवैज्ञानिक कल्पना वापरून ही दुकानदारी सुरू असते. पालकही आपण फसलो हे मान्य करत नाही.

साध्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसू शकणारी वस्तूच मुलगा ओळखू शकतो. काचेऐवजी लाकडी टेबल वापरला तर पत्ते ओळखू शकत नाही. डोळ्यांवरची काळी पट्टी बदलली तरी वस्तू ओळखता येत नाही.

काचेचे टेबल असते. त्यामागे डोळ्यावर पट्टी बांधून मुले उभी राहतात. समोर काही पत्ते उलटे ठेवले जातात. मुले कोणता पत्ता आहे हे ओळखतात. आली दिव्य दृष्टी. प्रत्यक्षात काचेखालचे प्रतिबिंब पाहिल्यावर मुलांना उत्तर सूचते. तोपर्यंत नाही.

नेमके काय केले जाते
दोनदिवसांच्या शिबिरात मुलांवर एका मोठ्या अंधाऱ्या खोलीत विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरील संगीत ऐकवले जाते. विविध ऑडिओ ऐकवले जातात. प्रशिक्षणानंतर याची सीडीही मिळते. दोन दिवसांनंतर मिडब्रेन किती अॅक्टिव्हेट झाला याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याने आपल्या पालकासमोर द्यायचे असते. हीच त्याची परीक्षा.
बातम्या आणखी आहेत...