आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाच्या कडाक्यातही लाखो भाविकांची पंढरपुरातं गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - राज्याच्या विविध भागातून आलेल्या वारकऱ्यांनी चैत्री एकादशीच्या सोहळ्यास उपस्थित राहून श्रीविठ्ठल दर्शनाचा आनंद घेतला. वारकऱ्यांनी पहाटेपासून एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या वाळवंटात पवित्र स्नानासाठी गर्दी केल्याने चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांनी फुलून गेला होता.
 
श्रीविठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग शुक्रवारी (दि. ७) सकाळी पत्राशेडपर्यंत पोहोचली होती. दुपारी पुन्हा ती सारडा भवनपर्यंत आली होती. श्रीविठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाबरोबरच मुख दर्शनासाठीही भाविकांची गर्दी झालेली दिसत होती. दरम्यान, एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले आहेत
बातम्या आणखी आहेत...