आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मांजरा’ची १५ दिवसांत गळती थांबवा, जलसंपदामंत्री महाजन यांचे अधिकाऱ्यांना आदेश; आमदार ठोंबरेचे निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी इम्पॅक्ट
कळंब - केज तालुक्याच्या सिमेवरील मांजरा धरणातील पाण्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने आतापर्यंत जवळपास टक्के पाणी वाहून गेले होते. याबाबत “दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करून याकडे लक्ष वेधल्यानंतर केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाराज यांना निवेदन दिले. याची गांभीर्याने दखल घेऊन १५ दिवसांमध्ये धरणावरील दुरुस्ती करून पाणीगळती थांबविण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करणाऱ्या दरवाजाचे रबर खराब झाल्याने पाणी वाहून जात आहे. त्याचबरोबर एका भिंतीलाही गळती लागल्यामुळे पाणी वाहून जाऊन धरणालाही धोका निर्माण झाला होता. या संदर्भात “दिव्य मराठी’ने बुधवारी (दि. १४) “नादुरुस्त दरवाजे प्रशासनाचे दुर्लक्ष, लाखो लिटर पाण्याची गळती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. दखल घेऊन आमदार संगीता ठोंबरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली.तसेच मांजरा प्रकल्पासंबधी सर्व तांत्रिक अडचणी आमदार ठोंबरेंनी मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर महाजन यांनी तत्काळ बीड लातूर येथील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानां दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी गळती संदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करून दुरूस्तीचे कामे पूर्ण करून पाणी गळती थांबविण्याचे आदेश दिले. कामचुकारपणा केल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...