आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील एक्स्प्रेस रेल्वेची गती वाढणारे; बोर्डाने तयार केला मिशन एरिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय रेल्वेला आता वेगाचे वेध लागले आहेत. गतिमान एक्स्प्रेस आणि टॅल्गोनंतर आता रेल्वे मंत्रालय देशातील सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढवणार आहे. नवीन रेल्वेमार्ग बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासते. त्यामुळे नवीन मार्गाएेवजी रेल्वे प्रशासन उपलब्ध रेल्वेमार्गाचा अधिकाधिक वापर करणार आहे. एक्स्प्रेस गाड्यांबरोबरच मालगाडीचाही वेग वाढवणार आहे. सध्या देशात एक्स्प्रेस दर्जाच्या गाड्या ताशी ५० ते ५५ प्रतिकमीच्या वेगाने धावतात. त्याचा वेग वाढवून आता ६० ते ६५ च्या वेगाने धावणार आहेत. तसेच मालगाडीचाही वेग वाढवण्यात येणार आहे. गाड्यांचा वेग वाढल्यामुळे प्रवासी आपल्या इच्छित स्थळी लवकर पोहोचतील, तसेच त्या मार्गावरून अन्य गाड्यादेखील धावतील.

गेल्या काही वर्षांपासून रेल्वेमार्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक गाड्या देशात विविध ठिकाणी धावत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक गाड्या धावत असल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडत चाललेले आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढवणे हे गरजेचे बनले होते. रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्याबरोबर रेल्वे इंजिनचीदेखील क्षमता वाढवली जात आहे. सध्या देशात ६००० अश्वशक्तीचे इंजिन धावतात. मात्र रेल्वे मंत्रालय इंजिनाची क्षमतादेखील वाढवत अाहे. सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून बिहार राज्यात रेल्वे इंजिन बनवण्याचा कारखाना तयार करीत आहे. येथे १२ हजार अश्वशक्तीचे इंजिन तयार करण्याचे काम केले जात आहे. मालवाहतुकीतून रेल्वेस मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन मालगाडीचाही वेग वाढवणार आहे. सध्या मालगाड्या सरासरी ताशी २५ ते ३० किमीच्या वेगाने धावतात. त्या आता ३० ते ४० च्या वेगाने धावतील. या िनर्णयामुळे रेल्वेच्या माल वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचीगती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्य संरक्षक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेने तयार केलेल्या मिशन एरियात एक्स्प्रेसची गती वाढवण्यात येईल. यामुळे सिंगल लाइन सेक्शनमधील गाड्या वेगाने धावतील. परिणामी प्रवाशांचा प्रवास लवकर होण्यास मदत मिळेल.
-मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक