आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: या आहेत महाराष्ट्राच्या ग्लॅमरस महिला आमदार, घेतला होता ओवेसींसोबत पंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्‍यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार आहेत. दांडगा जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळाऊ स्‍वभाव, प्रभावी वक्‍वृत्‍व या गुणांमुळे प्रणिती यांनी आपल्‍या वडिलांप्रमाणेच अत्‍यंत कमी कालावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवले. एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्‍यांची ओळख आहे. वर्ष 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य येथून त्या निवडून आल्या. परंतु, त्यानंतर 'एमआयएम' या पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद झाला होता. आज (मंगळवार) प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्‍यांच्‍या विषयी खास माहिती...
कायद्याच्‍या पदवीधर आहेत
प्रणिती यांनी 2001 मध्ये मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमधून कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये मुंबई विद्यापिठाच्या गर्व्हनमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी केले. प्रणिती यांना दोन बहिणी आहेत.
'जाई जुई विचार मंच' माध्‍यमातून सामाजिक कार्य
प्रणिती शिंदे यांनी 'जाई जुई विचार मंच' या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. कला आणि संस्कृती, बालके, पायाभुत सुविधा, दलितांचा विकास, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार, अल्प आर्थिक सहकार्य आदी विषयांवर या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते.

वर्ष 2014 मध्‍ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या सोलापूर मध्य मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या. या निवडणुकीत अल्प मतांनी विजयी झाल्याने त्यांनी याचे खापर आयआयएम या पक्षावर फोडले होते. हा पक्ष राष्ट्रविरोधी असून, त्याच्यावर आणि त्याच्या नेत्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर यावर बराच वाद झाला होता. आयआयएम पक्षाने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची नोटीस बजावली होती.
वडिलांकडून घेतले राजकारणाचे धडे
सुरुवातीला राजकाराणापेक्षा समाजसेवेत अधिक रस दाखवणा-या प्रणिती यांना वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. महाराष्ट्र पोलिसांत कॉन्सटेबल पदापासून देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत मजल मारलेले सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.

पुढील स्लाईडवर बघा, ग्लॅमरस राजकारणी प्रणिती शिंदे यांचे काही फोटो....