सोलापूर - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनात महिलांना पाठिंबा देत आमदार प्रणिती शिंदे सुद्धा सहभागी झाल्या. सत्ताधारी माहिलाविरोधी असून मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित खात्याचे मंत्री केवळ हेलिकॅप्टरमध्ये फिरण्यात मग्न आहेत अशी टीका आमदार शिंदे यांनी केली आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी; एप्रिल, मे आणि जून महिन्याचा मानधन देण्यात यावा. तसेच इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन उभारले आहे. मागण्या मान्य न झाल्यास 17 सप्टेंबरपासून आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देणार असा इशारा सुद्धा या महिला आंदोलकांनी दिला आहे.