आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार रमेश कदम यांचा शोध सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यावर मुंबईतील दहिसर (गोरेगावजवळ) पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. कालपासून सीआयडी, शहर, जिल्हा पोलिस त्यांच्या मागावर आहेत. सोमवारीही त्यांचा शोध लागला नाही. पुण्याचे सीआयडी पथकही माहिती घेत आहेत.
आमदार कदम यांनी रविवारी शहरात पत्रकार परिषद घेऊन मोहोळमधील दगडफेक प्रकरणी आपली बाजू मांडली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पत्रकार परिषदेतून त्यांनी काढता पाय घेतला. आपले वाहन सोडून दुस ऱ्याच कारमध्ये ते निघून गेले होते. यानंतर पोलिस पथक आले. सोमवारी त्यांची कार आढळल्यामुळे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...