आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्या\' वक्तव्याबद्दल आमदार परिचारकांची जाहीर माफी, म्हणाले- सर्व सैनिक - महिलांचा आदर करतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लष्करी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांनी माफी मागितली. परिचारक यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.परिचारक म्हणाले, गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत मी किंवा माझ्या कुटुंबीयांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. मात्र प्रचारसभेत अनवधानाने माझ्या तोंडून हे अपशब्द शब्द गेले. मी जवानांचा नेहमीच आदर करतो
 परिचारक यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वांनी निषेध आणि समाचार घेतल्यानंतर रविवारी त्यांनी माफी मागितली आहे. 
 
कोण आहे परिचारक 
- प्रशांत परिचारक हे भाजपच्या सहकाऱ्याने नुकतेच सोलापूरमधून विधान परिषदेची निवडणूक जिंकले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचीही काही मते मिळाली होती. 
- सत्तेच्या मस्तीत काहीही बोललो तर कोण काय करणार, अशीच त्यांची देहबोली होती. 
- सैनिक सीमेवर असतो आणि त्याची पत्नी गावी राहाते. परिचारक यांचे हे बेताल वक्तव्य महिलांच्या चारित्र्यावरच संशय घेणारे होते. 
- मीडिया रिपोर्टनुसार, परिचारक यांनी रविवारी माफी मागितली. ते म्हणाले, अनावधानाने माझ्या तोंडातून तसे निघाले. यासाठी मी सर्व सैनिक भाजव आणि महिलांची माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तरी सर्वांची माफी मागतो. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आमदार परिचारकांचे बेताल वक्तव्य... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...