आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या प्रारूप यादीत ६.७४ लाख मतदार, २१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी महापालिकेने प्रसिद्ध केली. त्यात सहा लाख ७४ हजार ३३६ मतदार आहेत. या यादीवर कोणाच्या सूचना असतील तर त्यांनी १७ जानेवारीपर्यंत अर्ज करावे. त्यावर सुनावणी होऊन २१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. महापालिका निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी यंदापासून सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, समितीची पहिली बैठक नॉर्थकोट प्रशाला येथे गुरुवारी झाली. 

शहराची लोकसंख्या लाख ५१ हजार ४५१ इतकी असून, त्यापैकी लाख ७४ हजार ३३६ मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ७०.८७ टक्के मतदार अाहेत तर लाख ७७ हजार २२२ इतक्या नागरिकांना मतदानाचा हक्क नाही. त्यांची टक्केवारी २९.१३ इतकी अाहे. पुरवणी यादीत ३.१४ टक्के मतदार वाढले. 

११ जणांची समिती 
आचारसंहिताअंमलबजावणीसाठी ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात विविध विभागाचे प्रमुख असणार आहेत. समितीची बैठक गुरुवारी झाली. त्यात व्हीडीओ ग्राफर सर्व्हे पथक, भरारी पथक, तक्रार निवारण कक्ष उभारण्याचे ठरले. 

आज होणार बैठक 
मनपानिवडणुकीत आदर्श आचारसंहिता प्रभावी अंमलबजावणीसाठी राजकीय पक्षांना माहिती व्हावी म्हणून विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता महापालिका कौन्सिल हाॅल येथे बैठक होईल. यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर मार्गदर्शन करतील. 
 
 
सद्यस्थितीत २१५ जण निवडणुकीसाठी अपात्र 
महापालिकानिवडणूक २०१२ मध्ये निवडणूक लढवली. त्यानंतर हिशेब दिला नाही म्हणून २२७ जणांना नोटीस दिली. आठ नगरसेवकांचे पद रद्द केले हाेते. त्यांनी निवडणूक आयोगाकडे अपिल करून पद कायम ठेवले होते. अन्य २१९ जणांनी नंतर आयोगाकडे अपिल केले. त्यापैकी चौघांचे अर्ज मान्य केले. अन्य २१५ जण निवडणूक लढवण्यास अपात्र असून, यापैकी ११ जण उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे. 

जगदीश पाटील यांनी अर्ज भरला पण... 
भाजपचे जगदीश पाटील यांचे नगरसेवक पद न्यायालयाने रद्द केल्याने, त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली. त्यावर जगदीश पाटील कायदेशीर लढाई लढत आहेत. पाटील यांच्याबाबत महापालिका निवडणूक कार्यालयात अद्याप कोणताही निकाल नाही. असे असले तरी जगदीश पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेने संकेतस्थळावर अपलोड केली आहे. महापालिका कार्पोरेशन डाॅट ओआरजी या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना ती यादी पाहता येईल. महापालिका निवडणूक कार्यालयात यादी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. या संकेतस्थळामुळे नागरिकांची सोय होणार आहे.