आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी अाघाडी; भारिप, समाजवादी, जदशी चर्चा, ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकानिवडणुकीत तिसरा पर्याय देण्यासाठी समाजवादी पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल भारिप-बहुजन महासंघाशी आघाडीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांनी दिली. सत्ताधारी विरोधक यांच्यात कुठलाही फरक राहिलेला नाही. शहराचा अपेक्षित विकास केला नाही. २५ वर्षे उलटूनही हद्दवाढ भागात अद्यापही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. सभागृहात विरोधी पक्ष प्रभावी नाही. अशा स्थितीत लोकांना तिसरा पर्याय हवा आहे. समविचारी पक्षांची तिसरी आघाडी किंवा डावी लोकशाही आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 
 
माकपची पूर्ण तयारी 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवडणुकीची जय्यत तयारी केली. सहा प्रभागातून २४ उमेदवार निश्चितही केले. परंतु तिसरा पर्याय मजबूत झाला तर सर्व जागा लढवू शकतो. या प्रयत्नांना यश मिळाले तर २० जानेवारीच्या आत उमेदवारयादी जाहीर करू.''- नरसय्याआडम, ज्येष्ठ नेते माकप.