आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यासमोर दारू विक्रीचा प्रयत्न, अवैध दारूविक्री विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा - तालुक्यातील वडनेर, देवगाव येथील अवैधरित्या सुरू असलेली दारूची विक्री बंद करावी या मागणीसाठी शनिवारी (दि.२) मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना पाटील यांनी परंडा पोलिस ठाण्यासमोरच मोफत दारूविक्रीचे दुकान थाटण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनासाठी आलेल्या मीना पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या पदाधिकारी यांना दारूच्या कॅनसह पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रसंगी अांदोलनकर्त्या महिला पोलिसांमध्ये दारूचे कॅन हिसकावण्यावरून झटापट झाली. 

 

मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना पाटील यांनी पोलिस अवैध दारूबंदी करण्यास असमर्थ असल्यामुळे पोलिस ठाण्यासमोर स्टाॅल लाऊन मोफत दारू वाटण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परंडा पोलिसांनी सकाळीपासूनच ठाणे परिसरात नाकाबंदी केली होती. मात्र, दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांनी ठाण्यासमोर येऊन दारूविक्रीचा प्रयत्न करताच बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे ठाणे परिसरात चांगलीच गर्दी झाली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी पदाधिकारी यांच्याशी तासभर चर्चा करून अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे अविनाश इटकर, शाबीर शेख, किशोर गायकवाड, शिवाजी शिवणकर, सुजित शिंदे आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...