आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण वाढतेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रस्त्यावरूनकिंवा दुचाकीवरून मोबाइलवरून बोलत जाताना मोबाइल हिसकावणे, पायी जाताना पाठीमागून येऊन अशाच प्रकारे मोबाइल घेऊन चोरटे पसार होत आहेत. दररोज किमान दोन तरी घटना घडत आहेत. नागरिकांनी सावध राहात मोबइल जपावेत. मोबाइल चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध लागणे अवघड आहे.
जुना कारंबा नाक्याजवळ शनिवारी रात्री मोबाइलवर बोलत भीमाशंकर वाकळे (रा. बाळे) थांबले होते. तीन तरुणांनी फोन करायचा आहे म्हणून त्यांचा मोबाइल घेऊन पळाले. दुसरा साथीदार त्यांची दुचाकी (एमएच १३ सी ८४८८) घेऊन पळून गेला. असा हा चोरीचा विचित्र प्रकार घडला आहे. फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. उमानगरीजवळही असाच प्रकार घडला.
सीडीआरसाठीवेळ लागतो :
अलीकडीलकाळात ५८ मोबाइल नागरिकांना मिळवून दिले. ८० मोबाइल आणखी ट्रॅकवर टाकले आहेत. त्यांचा सीडीआर पंधरवड्याला कंपनीकडून मिळतो. तोही यायला वेळ लागतो. राज्यात लोकेशन मिळाल्यास त्याचा शोध लागतो. कर्नाटक अन्य राज्यात गेल्यास त्या राज्यातील मोबाइल कंपन्यांना संपर्क साधून माहिती द्यावी लागते. हा तपास खूपच किचकट असल्याची माहिती, सायबर क्राइम कक्षाचे पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

नागरिकांनी ही काळजी घ्यावी
मोबाइललादोरी बांधून गळ्यात अडकवा. रस्त्यावरून जाताना हातात मोबाइल पकडता इयरफोनचा वापर करा. जर बोलत असाल तर डाव्या कानाला मोबाइल लावा. म्हणजे फूटपाथ अथवा रस्त्याच्या कडेला असल्यामुुळे चोरांना हिसकावता येत नाही. रस्त्यावर बोलताना मागावून अथवा समोरून कुणी संशयित येत असल्यास सावधगिरी बाळगा. तत्काळ पोलिसांत संपर्क करून माहिती द्या.
बातम्या आणखी आहेत...