आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता राहिली नाही रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती, अाधुनिक व्यवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जुने रेकॉर्ड सुस्थितीत ठेवण्यासाठी आठ अभिलेख कार्यालयास कॉम्पक्टर मशीन पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे मागील २०० वर्षांहून अधिक जुने असलेले रेकॉर्ड हाताळण्यास सुलभ होणार आहे. शिवाय, कॉम्पक्टरमुळे आगीपासून रेकॉर्ड जळण्याचा धोका आता पूर्णपणे टळण्यास मदत झाली आहे. कितीही मोठी आग, भूकंप पाऊस झाला तरी कॉम्पक्टरमधील रेकॉर्ड आहे त्या स्थितीत राहणार आहे.

जुने भविष्यकाळात उपयोगी पडणारे जुने रेकाॅर्ड अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे ठेवता येईल, हे रेकॉर्ड आहे त्या स्थितीत दीर्घकाळ कसे टिकेल, या दृष्टीने जिल्हा अधीक्षक कार्यालयाने कॉम्पक्टर मशीनची मागणी केली होती. राज्य शासनाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गतच कॉम्पक्टर मशीन उपलब्ध केली आहेत. याचा फायदा जिल्ह्याचे रेकॉर्ड सुस्थितीत राहण्याबरोबरच तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे.
उर्वरितपान
कॉॅम्पक्टर खोलीची जबाबदारी ही संबंधित अभिलेखापाल यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रत्येक कपाटास स्वतंत्र लाॅक सिस्टिम आहे. लॉक केल्यानंततर कपाटाचे पुढील भाग एकमेकास चिटकतो, यामुळे संबंधित विभागाचे रेकॉर्ड अस्ताव्यत पडणे, गाळ होणे, हरवणे असे प्रकार होण्यास आळा बसणार आहे.
मंत्रालयातील अागीनंतर खबरदारी...
मंत्रालयात लागलेल्या आगीनंतर राज्यभरातील रेकॉर्ड सुस्थितीत ठेवण्यासाठी कॉम्पक्टर बसविण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात अभिलेख कार्यालयात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या रेकॉर्डचे स्कॅनिंगही करण्यात आले असले तरी मूळ रेकॉर्ड सुस्थितीत राहण्यासाठी, त्याच्या नकला नागरिकांना तातडीने उपलब्ध होण्यासाठी ही यंत्रणा खूपच उपयुक्त ठरणार आहे.

कार्यालयात कार्यान्वित...
जून महिन्यातच शासनाकडून उत्तर सोलापूर, माढा, सांगोला, माळशिरस, दक्षिण सोलापूर नगर भूमापन या कार्यालयासाठी कॉम्पक्टर मशीन दाखल झाल्या आहेत. ती प्रत्येक तालुक्यास देण्यात आली आहे. सर्व तालुक्यात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामुळे मूळ रेकॉर्ड अधिक काळ टिकण्यास मदत होणार आहे, शिवाय आग, पूर, पाऊस यापासून कोणताही धोका निर्माण होणार नाही. किशोर जाधव, अधीक्षकजिल्हा भूमी अभिलेख.
विभागनिहाय रकाने...
कॉम्पक्टरमध्येसंबंधित तालुक्याचे रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील जमीनविषयक उतारे, नकाशे आदींचा समावेश आहे. अभिलेख कार्यालयाकडील भागनिहाय रकाने करून त्यामध्ये संबंधित जागेचे उतारे, नकाशे, शासकीय जागेसंबंधी सर्व कागदपत्रे विभागनिहाय ठेवल्याने त्यांच्या नकला तातडीने उपलब्ध होणार आहेत.
छायाचित्र: जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूमी अभिलेख कार्यलयात कॉम्पक्टर मशीन बसवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...