आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Molestation Youth Get Four Years Sentenced, Judgement Within 60 Days

विनयभंग; तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी, ६० दिवसांत निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - १६ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन ऊर्फ अनिल नागनाथ ननवरे (वय २२, रा. रुई, ता. माढा ) याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मंगळवारी दिले. ६० दिवसांत या खटल्याचा निकाल लागला.

पीडित मुलीने माढा पोलिसांत तक्रार दिली होती. फेब्रुवारी २०१६ रोजी ती घरी एकटीच होती. त्यावेळी ननवरे कोयता मागण्याचा बहाणा करून घरात शिरला. घरात अन्य कुणी नसल्याचे पाहून मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अनिल ननवरे विरोधात (कलम ३५४ - अाणि बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ नुसार) गुन्हा दाखल केला. यात तीन साक्षीदार तपासण्यात अाले. फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारतर्फे अॅड. शीतल डोके, अारोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधून तरुणाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात अाला.