आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपूर पावसासाठी हवी मोठ्या प्रमाणात वनसंपदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सगळीकडे गर्द हिरवी झाडी, वाहणारा थंड वारा, पक्ष्यांचा मनाला प्रश्न करणारा किलबिलाट, डोंगर-दऱ्यांमधून खळखळणारे झरे, मनाला भावणारा हिरवे शिवार, उन्हाच्या दाहकतेतही दिलासा देणारी शीतलता, अशा प्रकारचे कधी काळी प्रत्यक्षात असणारे आणि सध्या स्वप्न वाटणारे वातावरण पुन्हा निर्माण करणे अगदी शक्य आहे. यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हिरव्या क्रांतीची गरज आहे.

उन्हाची तीव्रता वाढत आहे. प्रत्येक वर्षी गेल्यावर्षींचा उन्हाळा यापेक्षा बरा होता, असे म्हणण्याची वेळ येत आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ४६ अंशांपर्यंत पारा पोहोचला होता. या दाहक परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ वृक्षलागवड हा एकच मार्ग आहे.

हवी वन संपदा : जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये दरवर्षी मान्सूमध्ये काळेकुट्ट ढग जमा होतात. मात्र, काही क्षणातच वाऱ्यामुळे आकाश पुन्हा निरभ्र होते. जेथे वृक्षांची संख्या कमी आहे, त्याच भागात असे प्रकार सर्रास घडतात. ढगांना पळवणाऱ्या वाऱ्याला थोपविण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे असे प्रकार घडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या ढगांना थोपविण्यासाठी वनसंपदेची गरज आहे.
भविष्य काळात विकासकामांना अडथळा होईल अशी जागा झाडे लावण्यासाठी नकोत. ज्या ठिकाणी झाडं लावायची आहेत त्या ठिकाणी विजांच्या तारा, डीपी नसल्याची खात्री करा. सरळ वाढणारे, मध्यम उंचीचे स्थानिक प्रजातींची झाडं लावण्यास प्राधान्य द्या. अशोक पाटील, वृक्ष अभ्यासक

असे करता येऊ शकते
>घरातील परसबागेत लहान, मोठी झाडं लावून शोभा वाढता येते.
>शेतातील बांधावर झाडांचे संगोपन करून उत्पन्नही घेता येईल.
>परिसरात एकत्रित येऊन मोकळ्या जागेत वृक्ष लावता येईल.
>घरात वाढदिवसनिमित्त वृक्षलागवड करून जोपासना
>जिल्ह्यातील वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन करणे
बातम्या आणखी आहेत...