आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरडवाडीत दोन चिमुकल्या भावंडांचा खून करून जमिनीत पुरले, आई ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/अकलूज- तालुक्याती लगोरडवाडी येथे दोन चिमुकल्यांचा खून करून जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. अवघ्या दोन वर्ष आणि चार महिन्यांच्या चिमुरड्यांचे पुरलेल्या स्थितीतील मृतदेह तहसीलदार बी. एस. माने यांच्या समक्ष उकरून काढल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी सांगितले. 

आदर्श मिसाळ (वय वर्षे) आणि प्रशांत मिसाळ (वय महिनेे) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. मागील आठ दिवसांपासून ही दोन मुले बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. गोरडवाडीचे पोलिस पाटील मल्हारी कर्णवर यांनी खबर दिल्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांकडे चौकशी करीत प्राप्त माहितीवरून हा दुहेरी खून उघडकीस आणला. परंतु माळशिरस पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारपासून वीज नसल्याने अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलांचे वडील संजय मिसाळ हे मजुरीचे काम करतात. मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करतात, असे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकरणी आईला ताब्यात घेऊन तिच्या चौकशीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच माळशिरसच्या तहसीलदार बी. एस. माने, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी तळ्याजवळ पुरलेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सोलापूर येथे पाठवले. 
बातम्या आणखी आहेत...