आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता न तू वैरिणी, प्रेमसंबंधात अडथळा ठरणा-या 2 चिमुकल्यांचा आईने असा काढला काटा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांचा मृतदेह काढताना गावकरी... - Divya Marathi
मुलांचा मृतदेह काढताना गावकरी...
माळशिरस- स्वत:ची दोन लहान मुले प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी या गावी उघडकीस आली आहे. या दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी मुलाची आई सोनाली संजय मिसाळ व  सोनालीचा भाऊ काका आप्पा आवळे (दोघेही रा. गोरडवाडी)  यांना अटक केली आहे. सोबतच सोनालीचा प्रियकर हरी शिरतोडे याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली. सदर घटना अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात पुढे येत आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या लहानग्यांना एखादी आई ठार कशी मारू शकते असा सवाल उपस्थित होत आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरडवाडी येथे संजय मिसाळ हा आपली पत्नी सोनाली व दोन लहान मुलांसह राहत होता. त्यास आदर्श मिसाळ ( वय- 2 वर्ष ) व  प्रशांत मिसाळ (वय- 4  महिने ) अशी दोन मुले आहेत. मात्र, सोनालीचे शेजारीच राहणा-या हरी शिरतोडे या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. यावरून पती संजय व सोनालीत वारंवार भांडणे होत असत. शिवाय या दोन लहानग्यामुळे सोनालीला  प्रेमसंबधास अडथळा ठरत होती. मला तुझ्या बरोबर नांदावयाचे नाही असे पती संजयला सोनाली म्हणत होती. पती सोडून व मुलांना मारून टाकून प्रियकर हरी शिरतोडेसोबत पळून जाण्याचा सोनालीचा डाव होता, असे आता बोलले जात आहे.
 
ज्या दिवशी सोनालीने मुलांना मारून टाकले त्यादिवशी सोनालीचा नवरा संजय हा नातेवाईकाच्या लग्नासाठी खुडूस येथील महालिंगेश्वर मंदिरात गेला होता.  या लग्नानंतर तो आपल्या अकलूज येथे असणा-या बहिण  छाया  साठेला भेटून गोरडवाडी येथे सायंकाळी आपल्या मुलांना खाऊ घेऊन घरी आला व  मुलांना उठविण्याचा प्रयत्न केला असता मुले कसलीच हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. याबाबत पत्नी सोनालीला विचारले असता तिने रागाने  मला काहीच माहित नाही असे सांगितले. त्यानंतर संजयने तत्काळ आदर्श या मुलास खासगी दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घरी गेल्यानंतर चा महिन्याचा दुसरा मुलगा प्रशांत हा सुद्धा मृत झाल्याचे आढळले. यावेळी संजय पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाला. मात्र त्याला सोनालीच्या घरच्यांनी विरोध केला व लागलीच अत्यसंस्कार करायला भाग पाडले. मात्र, त्यानंतर सोनालीने माझ्या मुलांना मारले असल्याचे सांगत मी  पोलिसांत जाणार आहे असे संजयने सांगितले. यानंतर त्याला सोनाली व तिच्या कुटुंबियांनी जीवे मारण्याची धमकी देवून गप्प बसविले.
 
अखेर दोन-तीन दिवसात गावात व परिसरात या गोष्टीची खमंग चर्चा रंगल्यानंतर संजयने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोन मुलांचे मृतदेह आठ ते  दहा फूट खड्डा खोदून पुरण्यात आले होते. हे मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहेत. या मुलांना मारण्यात सोनालीसह तिचा भाऊ काका आवळे याने मदत केल्याचे समोर येत आहे. सोनालीचा प्रियकर हरी शिरतोडे याचा यात सहभाग आहे की नाही याची चौकशी पोलिस करत आहेत. सोनाली व तिचा भाऊ काका आवळेला अटक करून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेतील छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...