आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईच्या जलप्रलयात मुलामुळे वाचली आई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अवघ्या पंधरा मिनिटात पाण्याने वेढले. घरातील महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मुलगा आणि सून कारमध्ये बसले. आई मागे राहिली. पाण्याची पातळीआणि प्रवाह वाढू लागल्याने आईला चालणेही अवघड झाले. यातून सुटका होणे अशक्य वाटू लागले. आई म्हणाली "मी मेले तरी चालेल, परंतु तू सुखरूप बाहेर पड.' पण मुलाने जीवाची पर्वा केली नाही. तो कारमधून उतरला. आईला कारमध्ये आणून बसवले. आईला मृत्यूच्या दाढेतून वाचवले. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या महाप्रलयात सोलापूरच्या अरुणा श्रीनिवास जक्कन यांच्यावर हा प्रसंग ओढावला होता.
अक्कालकोट रोड एमआयडीसीतील टेक्स्टाईल व्यापारी श्रीनिवास जक्कन यांचे चिरंजीव मिथून हे डॉक्टर आहेत. ते सध्या चेन्नईत प्रॅक्टिस करतात. पत्नीही डाॅक्टर आहे. मुलगा आणि सुनेला भेटण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी अरुणा चेन्नईला गेल्या. डिसेंबर रोजी दुपारनंतर पाऊस वाढला. सायंकाळी सहाला पाणी घरात शिरले. पाहता पाहता रात्री नऊपर्यंत गुडघ्याएवढे पाणी झाले. घराबाहेर पडेपर्यंत अवघ्या पंधरा मिनिटात कंबरेएवढे पाणी झाले. तेव्हा प्रसंगावधान राखून मिथून यांनी आईसह सुटका करून घेतली.

ते मित्राकडे गेले. मात्र संकट संपले नव्हते. तेथेही ग्राऊंड फ्लोअर आणि फस्ट फ्लोअरवर पाणी शिरले. हे दुसऱ्या मजल्यावर होते. रात्री उपाशी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी केवळ मॅगी आणि किलोचा भात खाऊन १२ जणांनी दोन दिवस काढले. रोजी दुपारनंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला. शनिवारी दुपारी बेंगलोर गाठले. सोलापूरला बुधवारी पोहोचले. पती, मुली आणि नातू यांना भेटून अरुणा यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
बातम्या आणखी आहेत...