आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांनी दाखवला जुगार अड्डा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाविद्यालयीन तरुणाला पोलिसांकडून झालेली मारहाण आणि सर्वसामान्यांवर पोलिसांकडून अन्याय होत असल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे खासदार शरद बनसोडे यांनी गुरुवारी (दि. १६) मंगळवेढा पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी खासदार बनसोडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना झापले. तसेच सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या. दरम्यान, पोलिसांना जुगार अड्डा दाखवला.
शहरात शिस्तीच्या नावाखाली पोलिस सर्वसामान्यांवर दशहत बसवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या शहरवासियांच्या तक्रारी होत्या. तसेच एका फौजदाराने महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केली. त्याची चित्रफीतही सोशल मिडीयावर प्रसारित झाली होती. या घटनांमुळे नागरिक पोलिसांत तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेऊन खासदार बनसोडे यांनी गुरुवारी मंगळवेढा पोलिस ठाण्याला भेट दिली.
शहरात अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याकडे लक्ष देण्याची सूचना खासदार बनसोडे यांनी पोलिसांना दिल्या. तसेच खासदार बनसोडे यांनी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांना सोबत घेऊन शहरातील जुगार अड्डाही दाखवला. तेथे पत्ते, दारुच्या बाटल्यांसह ९४०० रुपयांची रोकड आढळली. दरम्यान, जुगार खेळणाऱ्यांनी पलायन केले.

तरुणाला मारहाणीची नाही नोंद
खासदार बनसोडे यांनी पोलिस ठाण्यात डायरी पाहिली. त्यातही काही त्रुटी आढळल्या. तसेच फौजदाराने महाविद्यालयीन तरुणाला केलेल्या मारहाणीची डायरीला नोंद नसल्याचे दिसून आले. त्याविषयीही त्यांनी जाब विचारला.
बातम्या आणखी आहेत...