आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सर्वाधिक अनुदान मिळूनसुद्धा रमाई आवास योजना अंमल कासवगतीने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - शहरात अनुसूचित जमाती घटकातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये अनुदान देण्यात येते. शासनाचे नियम आणि अटींची पूर्तता होत नसल्याने योजनेचा लाभ लाभर्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून शासनाकडून आलेला निधी शहरात खर्च झाला नाही.
रमाई आवास योजना, नागरी दलित वस्ती सुधारणा आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेसह इतर योजनेचे सुमारे ४५ कोटी रुपये महापालिकेकडे शिल्लक आहेत. मागील आघाडी सरकार आताचे युती सरकारच्या काळात वाटप झालेला निधी खर्च झाला नसल्याने दलित वस्ती सुधारणा झालीच नाही, असे म्हणावे लागेल.

रमाई आवासयोजनेत बांधकाम परवाना अाणि लाभार्थीच्या मालकीची जागा अशी अट आहे. त्यामुळे पूर्ण रक्कम खर्च करू शकली नाही. श्रमसाफल्य योजना अंतर्गत घरकुल बांधण्यात येत आहे. लक्ष्मण चलवादी, मनपानगर अभियंता
दलित वस्तीसुधारणासाठी शासनाकडून अनुदान आले. निधी खर्च झाला नाही. रमाई योजनेत जाचक अटी असल्याने समाजकल्याण खात्याकडे पाठपुरावा केला. निधी खर्च झाला नाही चिंताजनक अाहे. आनंद चंदनशिवे, नगरसेवक